शहरं
Join us  
Trending Stories
1
रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक, मुंबईतील ब्रीच कॅन्डी रुग्णालयात ICU मध्ये दाखल
2
"इतिहास माझ्या कारकीर्दीचं मूल्यमापन कसं करेल?"; CJI चंद्रचूड नक्की काय म्हणाले?
3
‘सुंदर तरुणींनी इथेच थांबा, बाकीच्यांनी…’’, HODवर विद्यार्थिनींनी केला गंभीर आरोप 
4
राहुल गांधींच्या पत्त्यावर ऑनलाइन जलेबी ...; काँग्रेसच्या जखमेवर भाजपनं चोळलं मीठ!
5
BREAKING: घाटकोपरच्या नारायण नगरमध्ये भीषण आग, नागरिकांची धावपळ; दाट लोकवस्तीमुळे परिसरात घबराट
6
"पवार साहेब म्हणाले, सगळीकडे आयात उमेदवार नाही", तिकीट वाटपाबद्दल रोहित पवारांचं विधान
7
दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील, PWD ने लावले कुलूप; कारण काय? पाहा...
8
शरद पवारांची चालाख खेळी: हजारो इच्छुकांच्या मुलाखती, पण बारामतीतील पत्ता राखून ठेवला!
9
अपक्ष उमेदवार सावित्री जिंदाल यांचा भाजप सरकारला पाठिंबा; मंत्रीपदाबाबत नवीन जिंदाल म्हणाले...
10
सुप्रिया सुळे यांच्या कारमध्ये नेत्याने फाईलने लपवला चेहरा; अजित पवारांनी रोखठोक शब्दांत दिली प्रतिक्रिया 
11
"काँग्रेस पक्ष इंडिया आघाडीतील इतर पक्षांसाठी ओझं झालाय"; ज्योतिरादित्य शिंदेंचा खोचक टोला
12
INDW vs SLW : स्मृती मानधना अन् हरमनप्रीतपेक्षा जेमिमा भारी; इथं पाहा खास रेकॉर्ड
13
प्राजक्ताचा 'फुलवंती' प्रवास...!, सिनेमाबद्दल अभिनेत्री आणि गश्मीर महाजनी म्हणाला....
14
मनोज जरांगेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट, संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक; डॉक्टरने काय म्हटलं?
15
PAK vs ENG Test : तब्बल ५५६ धावा करुनही पाकिस्तानची 'कसोटी', इंग्लंडचे जोरदार प्रत्युत्तर; रुट-ब्रूकचे शतक
16
हरयाणातील पराभवानंतर उत्तर प्रदेशात सपाचा काँग्रेसला धक्का, केली मोठी घोषणा!
17
पाकिस्तानच्या सीमेलगत विणणार २२८० किमी लांब रस्त्यांचं जाळं, मोदी सरकारचा मोठा निर्णय
18
पहिल्यांदाच जम्मू काश्मीरची निवडणूक लढणाऱ्या ठाकरेंच्या उमेदवारांना किती मते मिळाली?
19
"मोदी-शाहांच्या आदेशाने महाराष्ट्रातील ७.५ लाख कोटी आणि ५ लाख रोजगार गुजरातने पळवले’’, काँग्रेसचा गंभीर आरोप  
20
सपा, शिवसेना अन् आपचा काँग्रेसला घरचा आहेर; हरयाणातील पराभवानंतर 'INDIA' मध्ये मतभेद

बदल्याची आग! एक्स बॉयफ्रेंड अन् त्याच्या गर्लफ्रेंडची हत्या करायला गेली; झाला 'तिचा'च भयंकर शेवट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 1:59 PM

Crime News : ओबीच्या नव्या गर्लफ्रेंडने सांगितलं की सारा मागील काही दिवसांपासून तिला सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी देत होती.

बदल्याची भावना ही आगीसारखीच असते. यामध्ये माणूस समोरच्याला जाळण्याचा प्रयत्न करतो, मात्र अनेकदा तो स्वतःच यात अडकतो. काही लोक अनेकदा रागात समोरच्याचा बदला घेण्यासाठी कोणत्याही थराला जातात मात्र याचा परिणाम काय होईल हे विसरतात. अशीच एक धक्कादायक घटना आता समोर आली आहे. ऑस्ट्रेलियातील एका तरुणीनेही आपल्या एक्स बॉयफ्रेंडला अद्दल घडवण्यासाठी बदला घेण्याचा निर्णय घेतला. मात्र तिने आपला एक्स बॉयफ्रेंड आणि त्याच्या नव्या गर्लफ्रेंडसाठी जो खड्डा केला, त्यात ती स्वतःच कोसळली आणि तिचा मृत्यू झाला.

ब्रिस्बेनमध्ये 10 मार्चला एक हैराण करणारी घटना घडली. डेली स्टारच्या रिपोर्टनुसार, एका 31 वर्षाच्या महिलेने आपल्या बॉयफ्रेंडसोबत आपलाही जीव घेतला. रिपोर्टनुसार, सारा मज आपला एक्स बॉयफ्रेंड स्टँली ओबी याच्या घरात रात्री 2 वाजता शिरली आणि घरात आग लावली. तिने घरात पेट्रोल ओतलं आणि ते पेटवून दिलं. ओबीची नवी पार्टनर आणि तिन्ही मुलं या घटनेत बचावली. मात्र ओबी आणि सारा यांचाच मृत्यू झाला. एका शेजाऱ्याने ओबीला आगीतून बाहेर काढलं मात्र तो इतका गंभीर जखमी झाला होता की त्याचा जीव वाचवणं शक्य झालं नाही. बचाव पथकाने नंतर साराचा मृतदेहही आगीतून बाहेर काढला. 

ओबीच्या नव्या गर्लफ्रेंडने सांगितलं की सारा मागील काही दिवसांपासून तिला सोशल मीडियावर जीवे मारण्याची धमकी देत होती. सारा आणि ओबी 2017 मध्ये भेटले आणि दोघांनी एकमेकांना डेट करण्यास सुरुवात केली. यादरम्यान दोघांना तीन मुलं झाली. सारा आणि ओबीच्या मित्रांनी डेली मेल ऑस्ट्रेलियाला त्यांच्या रिलेशनशिपबद्दल माहिती दिली. त्यांनी सांगितलं की ओबीची इच्छा नव्हती की लग्न न करताच त्यांची मुलं व्हावी. मात्र साराला मुलांना जन्म देण्याचं वेडच लागलं होतं. तिला 6 मुलं हवी होती. 

चौथ्या मुलानंतर ओबीला याला नकार दिला तेव्हा तिने ओबीला हे नातं संपवत असल्याचं सांगितलं आणि म्हटलं की त्याला ती फक्त एक स्पर्म डोनरप्रमाणे मानते. ज्यामुळे ती मुलं जन्माला घालू शकते.तिने सोशल मीडियाच्या मदतीने आफ्रिकन स्पर्म डोनरचा शोध घेतला. जेणेकरून तिची नंतरची मुलंही आधीच्या मुलांप्रमाणेच दिसतील. साराच्या मैत्रिणीने म्हटलं की सारा असं कधीही स्वतःहून करणार नाही. नक्कीच ओबीने तिला असं करण्यास भाग पाडलं असेल. रिपोर्ट्सनुसार, दोघांनीही कौटुंबिक हिंसाचाराचे गुन्हे दाखल केले होते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी