शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
2
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
3
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
4
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
5
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
6
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
7
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
8
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
9
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

झोपेतून उठवून तरुणावर गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 12:55 AM

चेंबूरमधील घटना; सराईत गुंडासहित तिघाना अटक

मुंबई : घरात झोपलेल्या एका तरुणाला उठवून त्याच्यावर गोळीबार करण्याची घटना गुरुवारी पहाटे चेबूर येथील वजीर बाबा चाळीत घडली. गोळीबारात सादिक इनायत खान (३६, रा. वजीर बाबा चाळ, चेंबूर) गंभीर जखमी असून त्याच्या पाठीत आणि डाव्या हाताच्या पंजात गोळी शिरली आहे. सायन रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची टिळकनगर पोलिसांत नोंद करण्यात आली आहे.याप्रकरणी सराईत गुंड नवनीत सिंग सुरेंद्रसिंग राणा, यासीन अन्सारी यांना टिळकनगर पोलिसांनी अटक केली असून एक जण फरारी आहे. पूर्ववैमनस्यातून त्यांनी हे कृत्य केल्याचे निरीक्षक लता सुतार यांनी सांगितले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, टेलरिंगचे काम करणाऱ्या सादिक खान हा पत्नी मेहरुनिसा समवेत चाळीत राहतो. पहाटे त्याचा दरवाजा जोरजोरात ठोठावत असल्याने त्याने दरवाजा उघडून कोण आहे, असे विचारले. तेव्हा बाहेर असलेल्या चौघांपैकी एकाने रिव्हॉल्वरमधून त्याच्या दिशेने दोन गोळ्या झाडल्या. त्याच्या आवाजाने पत्नी मेहरूनिसा हिने ओरडून शेजाऱ्यांना जागे केले. तिच्या आवाजाने हल्लेखोर पळून गेले. पोलिसांना कळविल्यानंतर निरीक्षक लता सुतार व त्याच्या सहकार्यांनी विविध पथके नेमून शिताफीने तपास सुरु केला. नवनीत राणा व अन्य दोघाना अटक केली. त्यानी गुन्ह्याची कबुली दिली. मे महिन्यात नवनीतचा भाऊ इंदरकुमार याला मारहाण केलेल्या सलीम सिद्दीक याला जामीन मिळवून देण्यासाठी खान दापत्याने मदत केली होती. त्याचा राग मनात धरून बुधवारी तुरुंगातून बाहेर आलेल्या नवनीतने बदला घेण्यासाठी अन्य तिघासमेवत हल्ल्याचा कट रचला. यामध्ये रौफ पटेल हा अद्याप फरार झाला आहे.