शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

नागपुरातील जरीपटक्यामध्ये सापडला भोपाळमधील वाँटेड आरोपी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2020 9:03 PM

खुनाचा प्रयत्न करण्याऱ्या भोपाळच्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली व भोपाळ पोलिसांच्या ताब्यात दिले. तो दोन वर्षापासून जरीपटका येथे दडून बसला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खुनाचा प्रयत्न करण्याऱ्या भोपाळच्या आरोपीला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली व भोपाळ पोलिसांच्या ताब्यात दिले. तो दोन वर्षापासून जरीपटका येथे दडून बसला होता. लालचंद गोवर्धनदास आसवानी (४५) असे या आरोपीचे नाव असून, तो बैरागढ येथील रहिवासी आहे. त्याच्या विरोधात भोपाळमध्ये खुनाचा प्रयत्न, चोरी यासह ४९ गुन्हे दाखल आहेत.अनेक प्रकरणांमध्ये सहभाग असल्याने लालचंद चर्चेत होता. भोपाळ पोलिसांपासून स्वत:ला दूर ठेवण्यासाठी तो नागपुरात आला होता. तो जरीपटक्यामधील दयानंद पार्कजवळ एका घरी कुटुंबीयांसह भाड्याने राहात होता. येथे तो लहान-मोठी कामे करायचा. क्राईम  ब्रँचच्या युनिट क्रमांक-२ ला यासंदर्भात गुप्त माहिती मिळाली. त्याच्याकडे चोरीच्या दोन दुचाकी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांच्या चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी ही माहिती भोपाळ पोलिसांना पुरविली. भोपाळ पोलीस आल्यावर त्याला अटक करून रवाना झाले. या कारवाईत पोलीस निरीक्षक भानुदास पिदुरकर, पीएसआय लक्ष्मीछाया तांबुस्कर, एएसआय मोहन साहू, हवालदार संतोष मदनकर, रामनरेश यादव, शिपाई रवी साहू, शेषराव राऊत, योगेश गुप्ता, निनाजी तायडे आदी सहभागी होते.

टॅग्स :Arrestअटकnagpurनागपूर