बापरे! कोरोना रुग्णावर वॉर्डबॉयचा बलात्कार; दुसऱ्या दिवशी मृत्यू, १ महिन्यानंतरही कुटुंबीयांना सुगावा नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 02:24 PM2021-05-13T14:24:09+5:302021-05-13T14:52:24+5:30

Rape in Covid patient by Wardboy : . महिलेने रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सला या लज्जास्पद घटनेची माहिती दिली.

Wardboy rapes woman in covid ward; Death the next day, even after 1 month, the family has no clue | बापरे! कोरोना रुग्णावर वॉर्डबॉयचा बलात्कार; दुसऱ्या दिवशी मृत्यू, १ महिन्यानंतरही कुटुंबीयांना सुगावा नाही

बापरे! कोरोना रुग्णावर वॉर्डबॉयचा बलात्कार; दुसऱ्या दिवशी मृत्यू, १ महिन्यानंतरही कुटुंबीयांना सुगावा नाही

Next
ठळक मुद्दे ही घटना ६ एप्रिलची आहे. याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर रुग्णालय व्यवस्थापन आणि पोलिसांनी बलात्काराच्या घटनेची माहिती कुटुंबियांना दिली नाही.

भोपाळ - कोरोनाच्या काळात अनेकजण चांगले कार्य करत आहेत, परंतु दुसरीकडे काही नराधम दुष्कृत्य करताना देखील आढळत आहेत. भोपाळ मेमोरियल हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या कोविड रुग्णासोबत वॉर्डबॉयने  धक्कादायक घटना घडवून आणली. वॉर्डबॉयने कोरोना रुग्णावर बलात्कार केला. बलात्कारानंतर महिलेची तब्येत खालावली आणि तिला व्हेंटिलेटरमध्ये हलविण्यात आले. दुर्दैवी गोष्ट म्हणजे दुसर्‍याच दिवशी त्या महिलेचा मृत्यू झाला. कुटुंबियांना सर्वसामान्य कोरोना रुग्णाच्या मृत्यूप्रमाणे झाल्यासारखे धरून चालत होते. महिलेने रुग्णालयात कार्यरत असलेल्या नर्सला या लज्जास्पद घटनेची माहिती दिली.

ही घटना ६ एप्रिलची आहे. याप्रकरणी पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर रुग्णालय व्यवस्थापन आणि पोलिसांनी बलात्काराच्या घटनेची माहिती कुटुंबियांना दिली नाही. घरातील सदस्यांपासून बलात्काराचा विषय लपवताना पोलिसांनी आरोपी वॉर्ड बॉयला तुरूंगात पाठविले. संपूर्ण प्रकरण निशातपुरा परिसरात घडलेला आहे. आरोपी वॉर्डबॉयवर नर्सिंगच्या विद्यार्थ्याकडून बलात्कार केल्याचा आरोपही केला जात आहे.

मीडिया रिपोर्टनुसार आरोपीने चेकअपच्या नावाखाली महिलेसोबत लैंगिकअत्याचार केले होते. तक्रारीत रुग्णालय व्यवस्थापनाकडे पोलिसांना तीच माहिती आहे. त्याचबरोबर पोलिस आणि रुग्णालयातील लोकांनी कुटुंबातील सदस्यांना या घटनेची माहिती का दिली नाही, असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. सध्या ही लोकं मौन बाळगून राहिली  आहेत.



त्याचवेळी स्थानिक वृत्तपत्राशी बोलताना या प्रकरणाचे तपास अधिकारी बनवारीलाल म्हणाले की, मी पीपीई किट परिधान केलेल्या महिलेचा जबाब घेण्यासाठी गेलो होतो. पण त्याची प्रकृती ठीक नव्हती, म्हणून मला त्यांचा जबाब घेता आला नाही. तपास अधिकाऱ्याने सांगितले की, टीआय साहेबांशी  बोलल्यानंतर ते त्या महिलेच्या कुटूंबाला माहिती देणार की नाही हे ठरवतील. या संपूर्ण वादावर रुग्णालय व्यवस्थापनाकडून त्यांची बाजू कळालेली नाही. विशेष म्हणजे वॉर्डबॉयच्या दुष्कर्मांमुळे मध्य प्रदेशातील बऱ्याच मोठ्या शहरांना लाजेने मान घालावी लागली आहे. ग्वाल्हेरमध्येही वॉर्डबॉयने बलात्काराचा प्रयत्न केला. काही दिवसांपूर्वी इंदौरमध्ये वॉर्डबॉयवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Read in English

Web Title: Wardboy rapes woman in covid ward; Death the next day, even after 1 month, the family has no clue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.