वॉर्डबॉयनं नर्सच्या डोक्यात झाडली गोळी अन् मारलं ठार, रक्ताच्या थारोळ्यात पडला होता मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2022 03:59 PM2022-02-11T15:59:17+5:302022-02-11T16:03:52+5:30
Shotdead Case :आरोपी वॉर्ड बॉयला पोलिसांनी अटक केली आहे, तसेच मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मध्य प्रदेशातील भिंड येथील जिल्हा रुग्णालयात एका वॉर्ड बॉयने नर्सच्या डोक्यात गोळी झाडून तिची हत्या केली. त्यावेळी नर्स ड्युटीवर होती. नर्सचे मे महिन्यात लग्न होणार असल्याने प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपी वॉर्ड बॉयला पोलिसांनी अटक केली आहे, तसेच मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
नर्स नेहा चंदेला गुरुवारी आयसीयूच्या ड्युटी रूममध्ये बसल्या होत्या. त्यानंतर वॉर्ड बॉय रितेश शाक्य तेथे पोहोचला आणि तिच्या डोक्यात गोळी झाडून घटनास्थळावरून पळ काढला. हॉस्पिटलच्या इतर कर्मचाऱ्यांना नर्स नेहाच्या हत्येची माहिती मिळाली तेव्हा नेहाचे सहकारी तिच्या खोलीत पोहोचले. जिथे त्याला नेहाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसला. हे दृश्य पाहून रुग्णालयात एकच खळबळ माजली. या घटनेची माहिती तात्काळ पोलिसांना देण्यात आली. तपासादरम्यान पोलिसांना रितेशची माहिती मिळाली आणि त्याला तत्काळ अटक करण्यात आली. त्याचवेळी या घटनेनंतर नेहाच्या कुटुंबीयांची अवस्था वाईट झाली आहे. कुटुंबियांवर एवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळला यावर त्यांचा विश्वास बसत नाही. घरच्यांनी लग्नाची सर्व तयारी केली होती. पण आपल्यासोबत एवढी मोठी घटना घडेल याची त्यांना कल्पना नव्हती.
खड्ड्यात उपाशी ठेवलं, थंड पाण्यात केलं उभं; IPS अधिकाऱ्याकडे काम करणाऱ्या मुलीनं सांगितली सुन्न करणारी कहाणी
पोलिसांनी आरोपीला अटक केली
या प्रकरणावर एसपी शैलेंद्र सिंह यांनी सांगितले की, आरोपी रितेश शाक्य नेहाच्या प्रेमात होता आणि नेहाचा साखरपुडा निश्चित झाला होता, यामुळे रितेश खूप दुःखी होता आणि त्याने नेहाची गोळी झाडून हत्या केली. सध्या पोलीस रितेशची चौकशी करण्यात व्यस्त आहेत. गोळी लागल्याने नर्सचा जागीच मृत्यू झाला होता. नेहा चंदेला मंडला जिल्ह्यातील रहिवासी आहे.