Video : कोरोना नियम मोडणाऱ्या पतीला बसला 100 रुपयांचा दंड; संतापलेल्या पत्नीनं चप्पल हातात घेऊन घातला राडा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 06:26 PM2021-05-21T18:26:47+5:302021-05-26T10:39:21+5:30

कोरोना नियमांचं उल्लंघन करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली, त्यानंतर त्याची पत्नी चप्पल हातात घेऊन अधिकाऱ्याला मारायला धावली...

watch video, Madhya Pradesh News 100 rupees fine on husband Women run to beat sdm | Video : कोरोना नियम मोडणाऱ्या पतीला बसला 100 रुपयांचा दंड; संतापलेल्या पत्नीनं चप्पल हातात घेऊन घातला राडा 

Video : कोरोना नियम मोडणाऱ्या पतीला बसला 100 रुपयांचा दंड; संतापलेल्या पत्नीनं चप्पल हातात घेऊन घातला राडा 

googlenewsNext

मध्यप्रदेश येथील अशोकनगर येथे मास्क न घालणाऱ्या पतीला 100 रुपयांचा दंड भरावा लागला म्हणून त्याची पत्नी प्रचंड संतापली. तिनं पतीवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यावर चप्पल उगारली अन् शिवीगाळ केली. चंदेरी येथे गुरुवारी रात्री ही घटना घडली. महिलेनं त्या अधिकाऱ्याला मारण्यासाठी चप्पल हातातच घेतली नाही, तर त्याला मारण्यासाठी ती मागेही धावली. महिलेच्या रोषापासून वाचण्यासाठी अधिकाऱ्यानं स्वतःला आपल्याच गाडीत बंद केले. त्यानंतर पोलिसांनी त्या महिलेवर व तिच्या पतीवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केले.

चंदेरी येथील ढोलिया दरवाजाजवळ हा राडा झाला. रात्री 8 वाजता अधिकारी व पोलिस यांच्याकडून संयुक्त कारवाई करण्यात येत होती. कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ते दंड वसूल करत होते. एसडीएम देवेंद्रप्रात सिंह हेही त्या तुकडीसोबत होते. यावेळी पवन पुत्र पुरुषोत्तम सोनी नावाची व्यक्ती मास्क न घातला तिथून बाईकवरून जात होती आणि त्या व्यक्तीकडून 100 रुपयांचा दंड वसूलण्यात आला. त्याचबरोबर पोलिसानं त्या तरुणाच्या बाईकचा हेडलाईटही फोडला. पवननं ही गोष्ट घरी येताच पत्नीला सांगितली. आपल्याला मारहाणही झाल्याचे त्यानं पत्नीला सांगितलं. 

त्यानंतर हेमलता सोनी ही भडकली आणि अधिकाऱ्यांना शिवीगाळ करण्यासाठी घटनेच्या ठिकाणी पोहोचली. दंडाची कारवाई केल्यानंतर बाईकचा हेडलाईट फोडल्याप्रकरणी त्याठिकाणी असलेल्या स्टाफला या महिलेनं चांगलंच सुनावलं.  हेमलतानं SDM देवेंद्रप्रताप सिंह यांना चप्पलेनं मारहाण करण्याचा प्रयत्न केला. पण, अन्य लोकांनी तिला अडवलं. तरीही ती SDMला मारण्यासाठी त्यांच्या मागे धावली. त्यावेळी तिथे महिला पोलीस कर्मचारी उपस्थित नव्हत्या. पण, नंतर पवन व हेमलता यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांना अटक केली गेली.

पाहा व्हिडीओ.

Web Title: watch video, Madhya Pradesh News 100 rupees fine on husband Women run to beat sdm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.