नारायण जाधव
नवी मुंबंई - येथील जेएनपीए बंदरातील तस्करी थांबतां थांबताना दिसत नसून पाण्याची बाटली, चुंबकीय बटण, बेल्ट बकल म्हणून घोषित केलेल्या 40 फुटी कंटेनरमध्ये ई सिगरेटचा मोठा साठा पकडला आहे. या ई सिगरेटची किंमत सुमारे तीन कोटी रुपये असल्याचे जेएनपीएतील सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
पाण्याच्या बॅाटल, चुंबकीय बटन, बेल्ट बक्कल आणले असल्याचे आयातदाराने दाखविले होते. मात्र गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहिती नुसार सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यानी या कंटेनरची तपासणी केली. तेव्हा त्यात ई-सिगारेटच्या 45,686 युनिट्स आढळले. त्यांची किंमत 3 कोटी रुपये आहे इलेक्ट्रॉनिक सिगारेट्स (उत्पादन, उत्पादन, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, संचयन आणि जाहिरात) कायदा, 2019 नुसार देशात ई-सिगारेटची आयात प्रतिबंधित आहे. त्यामुळे गुन्हा दाखल करून पुढील तपास प्रक्रिया सुरू केली आहे.