शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

सुपर कॉप राकेश मारिया यांच्या कारकिर्दीवर वेबसीरीज; दिग्दर्शिका मेघना गुलजार दिग्दर्शित करणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2018 16:47 IST

26/11 चा मुंबईतील दहशतवादी हल्ला, 1993 चा साखळी बॉम्बस्फोट, शीना बोरा हत्याकांड, नीरज ग्रोव्हर हत्याकांड या घटना वेबसीरिजमधून दाखविणार 

मुंबई - माजी मुंबई पोलीस आयुक्त आणि सुपर कॉप म्हणून ओळखले जाणारे राकेश मारिया यांच्या कारकिर्दीवर आधारीत एक वेबसीरीज येणार आहे.  १९८१ च्या आयपीएस बॅचचे मारिया असून ते गेल्या वर्षी होम गार्ड विभागाच्या पोलीस महासंचालकपदी निवृत्त झाले आहेत. राजी सिनेमाच्या दिग्दर्शिका मेघना गुलजार ही वेबसीरिज दिग्दर्शित करणार आहेत. या वेबसीरीजमध्ये  26/11 चा मुंबईतील दहशतवादी हल्ला, 1993 चे साखळी बॉम्बस्फोट, शीना बोरा हत्याकांड, नीरज ग्रोव्हर हत्याकांड आदी विषय यात दाखवले जाणार आहे. राकेश मारिया यांच्यावरील ही वेबसीरिज, अनिल अंबानी यांच्या रिलायंस एन्टरटेन्मेंटच्या फॅण्टम फिल्म यांची निर्मिती असणार आहे. याची माहिती मेघना गुलजार यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.  

या वेबसीरिजबाबत राकेश मारिया उत्सुक आहेत आणि या वेबसीरीजमध्ये कोणते कलाकार झळकणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. मेघना गुलजार दिग्दर्शित राजी या सिनेमाने बॉलिवूडमधील 100 कोटी क्लबच्या सिनेमांच्या यादीत मोठ्या दिमाखात प्रवेश केला होता. एखाद्या महिला दिग्दर्शिकेने बनवलेला सिनेमा 100 कोटी रूपये कमावण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यामुळेच आता या वेबसीरिजबद्दल उत्सुकता वाटत आहे.

 

टॅग्स :Crimeगुन्हाentertainmentकरमणूकPoliceपोलिस26/11 terror attack26/11 दहशतवादी हल्लाSheena Bora murder caseशीना बोरा हत्या प्रकरणRakesh Mariaराकेश मारिया