West Bengal Assembly Elections 2021 : धक्कादायक! कार्यकर्त्याचा मतदानादिवशीच आढळला मृतदेह; भाजपाने केला हत्येचा गंभीर आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2021 01:10 PM2021-03-27T13:10:33+5:302021-03-27T16:14:13+5:30
West Bengal Assembly Elections 2021 : केशियारीमध्ये भाजपा कार्यकर्ता मंगल सोरेनचा मृतदेह आढळला आहे. या कार्यकर्त्याला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा भाजपाने केला आहे.
कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीसाठीच्या (West Bengal Assembly Election 2021) पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली आहे. 294 जागांपैकी 30 जागांसाठी होत असलेल्या मतदानासाठी मतदाता मोठ्या प्रमाणात बाहेर पडताना दिसत आहेत. सत्ताधारी तृणमूल काँग्रेस व भाजपा यांच्यात मुख्य लढत असल्याचे मानले जात आहे. काँग्रेस व डाव्यांच्या आघाडीचेदेखील आव्हान राहणार आहे. पहिल्या टप्प्यात पुरुलिया व झारग्राम येथील सर्व मतदारसंघ तसेच बांकुरा, पूर्व मेदिनीपूर व पश्चिम मेदिनीपूरमधील काही मतदारसंघांचा समावेश आहे. याच दरम्यान आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाजपा कार्यकर्त्याची हत्या झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केशियारीमध्ये भाजपा कार्यकर्ता मंगल सोरेनचा मृतदेह आढळला आहे. या कार्यकर्त्याला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा भाजपाने केला आहे. "घरात घुसून झोपलेल्या भाजपा कार्यकर्त्याला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली" असं म्हटलं आहे. रात्री मंगल सोरेन बाहेर झोपला होता, सकाळी त्याचा त्याच ठिकाणी मृतदेह आढळला असं सांगितलं जात आहे. भाजपा उमेदवार सोनाली मुर्मु यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सकाळी असं ऐकायला मिळालं, की बेगमपूर चार नंबर बूथवर एका भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. त्याची हत्या करण्यात आली आहे. रात्री तो घराबाहेर झोपला होता, मात्र सकाळी त्याच्या आईला त्याठिकाणी त्याचा मृतदेह दिसला."
"दीदींचा खेळ सुरू! राज्यात 130 पेक्षा जास्त भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येला ममतांचा पक्ष जबाबदार"https://t.co/leYsNh1WEE#WestBengalElections2021#MamataBanerjee#TMC#BJP#Politics#KailashVijyavargiyapic.twitter.com/m4h0g1rdVC
— Lokmat (@MiLOKMAT) March 24, 2021
"ही अत्यंत दुःखद घटना असून प्रकरणाचा तपास व्हायला पाहिजे" अशी मागणी मुर्मु यांनी केली. सोबतच कार्यकर्त्याच्या शरीरावर अनेक जखमा असून त्याच्या डोक्यालाही मार लागला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. भाजपचे बंगालचे अध्यक्ष दिलीर घोष यांनी माझ्यापर्यंत ही बातमी आली आहे, की हत्या झाली आहे. हे सर्व केवळ भीती पसरवण्यासाठी केलं जात आहे. मात्र, लोक याचं उत्तर नक्की देतील. जे भीती पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना लोक सहन करणार नाहीत असं घोष यांनी म्हटलं आहे.
"दीदींचा खेळ सुरू! राज्यात 130 पेक्षा जास्त भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येला ममतांचा पक्ष जबाबदार"
बंगालच्या कूचबिहार लोकसभा क्षेत्रात (Coochbehar) दिनहाटाचे विभागीय अध्यक्ष अमित सरकार यांचा फासावर लटकवलेला अवस्थेत मृतदेह आढळला आहे. पक्ष कार्यालयाच्या जवळच त्यांचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन भाजप कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अमित सरकार यांची पूर्व नियोजित हत्याच आहे, असा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहे. तसेच "राज्यात आतापर्यंत 130 पेक्षा जास्त भाजपा कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्येला ममतांचा पक्ष जबाबदार आहे" असं देखील भाजपाने म्हटलं आहे.
भाजपाने या प्रकरणाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी त्यांनी विशेष पोलीस पर्यवेक्षकाकडे संपूर्ण घटनेचा अहवाल मागितला आहे. भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय (Kailash Vijyavargiya) यांनी या घटनेवरुन भाजपावर निशाणा साधला आहे. "दीदीचा खेळ सुरू, ममता सरकारच्या राजनैतिक हिंसाचाराचा अंत अजूनही झालेला नाही. कूचबिहार लोकसभा क्षेत्रातील दिनहाटाचे विभागीय अध्यक्ष अमित सरकार यांना टीएमसीच्या गुंडांनी फासावर लटकवलं. राज्यात आतापर्यंत 130 पेक्षा जास्त भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येला ममतांचा पक्ष जबाबदार आहे" असा आरोप विजयवर्गीय यांनी केला आहे.
"पुतण्या आणि कंपनीने पैसा खाल्ला, मोदींनी पाठवलेल्या 'त्या' पैशावर डल्ला मारला"https://t.co/YQQLuTyFRh#WestBengalElection2021#WestBengal#mamatabanerjee#TMC#AmitShah#BJP#Politicspic.twitter.com/fbs4XzYK4o
— Lokmat (@MiLOKMAT) March 23, 2021