एस. पी. सिन्हापाटणा : बिहारची राजधानी पाटण्यात थक्क करणारी घटना घडली आहे. मधुचंद्राच्या वेळी वधूने वराची चपलेने धुलाई केल्याचे वरपक्षाचे म्हणणे आहे, तर सासरकडील लोकांनी तिला घराबाहेर काढल्याचा वधू पक्षाचा आरोप आहे. या घटनेनंतर नववधूने तिच्या माता-पित्यासह नवरदेवाच्या घरासमोर धरणे धरले आहे.
स्मिता व रोहित यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला होता. तिचे म्हणणे आहे की, तिच्या वडिलांनी त्यांच्या कुवतीनुसार हुंड्यात खूप काही दिले आहे; परंतु विवाहानंतर चारच महिन्यांत सासरकडच्यांनी तिला घराबाहेर काढले, तर नवरदेवाकडील लोकांचे म्हणणे आहे की, तिने मधुचंद्रावेळी रोहितला मारहाण केली होती. मागील दोन दिवसांपासून सुरू असलेले हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचले आहे. पोलिसांनी रोहितच्या घरासमोर तात्पुरती चौकीही उभारली आहे. दोन्ही बाजू त्यांच्या मतांवर ठाम आहेत. गल्लीतील लोक दोन्ही बाजूंना समजावण्याचा हरप्रकारे प्रयत्न करीत आहेत; परंतु प्रकरणाचा तिढा सुटता सुटत नाही.
घरासमोर धरणे...नववधूचे म्हणणे आहे की, तिला सासरी नांदायचे आहे; परंतु सासरचे लोक तिला राहू देत नाहीत. सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी विजय सिंह, त्यांची पत्नी व रोहितचा आरोप आहे की, त्यांच्या घरासमोर धरणे धरलेल्या सुनेने व त्यांच्या कुटुंबीयांनी घराची वीज कापली आहे. त्यामुळे या कडक उष्म्यातही त्यांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. पोलीस हे प्रकरण सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत.