शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मण हाकेंचीही पंकजा मुंडेंना साथ; दसरा मेळाव्याला हजर राहण्याची घोषणा करत म्हणाले...
2
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, दोन तास प्रवाशांचा जीव टांगणीला, अखेर सुरक्षित लँडिंग
3
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटीसाठी टीम इंडियाची घोषणा; बुमराहला पुन्हा उप कॅप्टन्सीचा मान
4
MPSC विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; 'या' दोन परीक्षांबाबत आयोगाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय!
5
राजेगटाचं अखेर ठरलं! संजीवराजेंच्या नेतृत्वात तुतारी हाती घेणार; रामराजे नक्की काय करणार?
6
अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश, मिळाली मोठी जबाबदारी
7
"माझं केवळ त्याच्या पेन्शनवर प्रेम होतं’’, लव्ह ट्रँगलमधून ३५ वर्षाच्या प्रेयसीने वृद्धाची केली हत्या
8
१२० मिनिटांचा थरार, समोर होता मृत्यू, पण वैमानिकानं दाखवलं प्रसंगावधान, असं उतरवलं विमान 
9
ऑस्ट्रेलियाविरूद्ध कसोटी मालिकेला रोहित शर्मा मुकणार? कर्णधार, सलामीवीरासाठी 'ही' नावं चर्चेत
10
महिलांसाठी दिलासादायक बातमी: 'लाडकी बहीण'साठी अर्ज करण्याची मुदत वाढवली, 'ही' असेल शेवटची तारीख!
11
तू ही जरियाँ.. तू ही मंजिल है...! 'अ‍ॅनिमल' फेम तृप्ती डिमरीच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा
12
पोटच्या मुलाला भेटण्यासाठी धडपडणाऱ्या आईची तिच्या पतीनेच भररत्यात गळा चिरून केली हत्या 
13
क्रिकेटच्या खेळातील ४ महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल! नव्या हंगामापासून लागू होणार नवे नियम
14
बोपदेव घाट बलात्कार प्रकरण: पोलिसांनी आतापर्यंत किती आरोपींना अटक केलीये?
15
"उभे राहणार का", सयाजी शिंदेंना निवडणुकीबद्दल प्रश्न; अजित पवारांनी दिलं भारी उत्तर
16
७६०० कोटींच्या ड्रग्ज प्रकरणी ईडीची कारवाई, दिल्ली-मुंबईत छापेमारी, गुन्हा दाखल
17
"...म्हणून मी मंत्रिमंडळ बैठकीतून तडकाफडकी निघालो?", अजित पवार यांनी केलं स्पष्ट 
18
भारतीय जवानांचा जीव धोक्यात, इस्रायलच्या 'या' निर्णयावर भारताने व्यक्त केली चिंता; जाणून घ्या काय आहे धोका
19
सैनी सरकारचा १५ ऑक्टोबरला शपथविधी, PM मोदींसह भाजप शासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार!
20
नोएडातील एमिटी युनिव्हर्सिटी परिसरात दोन गटांमध्ये गोळीबार, एक विद्यार्थी जखमी

अल्पवयीन मुलांना झालंय तरी काय? लैंगिक अत्याचाराच्या घटनांत वाढ

By मनीषा म्हात्रे | Published: December 02, 2022 6:43 AM

माटुंग्यात वर्गातच दोघांकडून विद्यार्थिनीवर अत्याचार, कल्याणला नऊ वर्षांच्या मुलीची बलात्कारानंतर हत्या

न कळत्या वयात हाती आलेले मोबाइल, सहज उपलब्ध होणारे पोर्न, त्यातून शरीरसंबंधांबद्दलचा विकृत दृष्टिकोन, त्याच्या परिणामांची जाणीव नसल्याने घडणारे टोकाचे गुन्हे या विळख्यात अल्पवयीन मुले सापडली आहेत. किरकोळ कारणांवरून वाढणारी हिंसेची, सूड घेण्याची प्रवृत्ती यामुळे अल्पवयीन मुले गुन्ह्याच्या विळख्यात अडकत असल्याचे महामुंबईतील दोन घटनांतून दिसून येते. मानसोपचार तज्ज्ञांनी या घटनांची गंभीर दखल घ्या, असा गंभीर इशारा दिला आहे. 

मनीषा म्हात्रे मुंबई : पालिकेच्या शाळेत वर्गातील विद्यार्थी डान्सच्या तासासाठी बाहेर जाताच आठवीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी १३ वर्षीय विद्यार्थिनीवर वर्गात लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना माटुंग्यात उघडकीस आली आहे. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन विद्यार्थ्यांविरोधात गुन्हा नोंदवला आहे. 

सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ही घटना घडली. अस्वस्थ वाटत असल्याने पीडित मुलगी वर्गातच थांबली होती. याचा गैरफायदा घेत वर्गातील दोन अल्पवयीन मुलांनी दरवाजा लावून घेत तिच्यावर आळीपाळीने लैंगिक अत्याचार केले. कुणाकडेही वाच्यता केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. दोघांच्या तावडीतून सुटका होताच विद्यार्थिनीने थेट घर गाठले. तिने शाळेत जाण्यास नकार दिला. शांत-शांत राहणाऱ्या मुलीकडे तिच्या वहिनीने विश्वासात घेत चौकशी केली. त्यानंतर मुलीने प्रकरणाला वाचा फोडली. वहिनीने मुलीला धीर देत बुधवारी माटुंगा पोलिस ठाणे गाठले.  पोलिसांनी जबाब नोंदवत, त्या दोन विद्यार्थ्यांविरोधात लैंगिक अत्याचार आणि पोक्सोअंतर्गत गुन्हा नोंदवला. या घटनेमुळे विद्यार्थिनीला जबरदस्त मानसिक धक्का बसला असून, तिचे समुपदेशन करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले. 

तपास सुरू पीडित मुलगी आणि आरोपी एकच वर्गातील असून या प्रकरणी गुन्हा नोंदवला असल्याचे माटुंगा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी सांगितले. तसेच, या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले. 

लाेकमत न्यूज नेटवर्क कल्याण : स्टेशन परिसराजवळच्या साेसायटीच्या आवारात गुरुवारी सकाळी एका नऊ वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. या अल्पवयीन मुलीवर आधी बलात्कार करून नंतर तिची गळा चिरून हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे. पाेलिसांनी एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी केलेल्या मारहाणीचा बदला म्हणून हे कृत्य केल्याचा अंदाज आहे. स्टेशन परिसरात बस डेपाेला लागून ‘न्यू माेनिका’ साेसायटी आहे. रहिवासी सकाळी जागे झाल्यानंतर त्यांना आवारात एका नऊ वर्षांच्या मुलीचा मृतदेह आढळला. त्यांनी घटनेची माहिती देताच वरिष्ठ पाेलिस निरीक्षक अशाेक हाेनमाने घटनास्थळी आले. पाेलिस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी प्रकरणाचा तपास सुरू केला. 

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून नंतर धारदार शस्त्राने गळा चिरून हत्या केल्याचे उघड झाले. या प्रकरणी १५ वर्षांच्या संशयिताला ताब्यात घेतले. हत्या झालेली मुलगी आणि पोलिसांनी ताब्यात घेतलेला मुलगा हे दोघेही त्याच परिसरात रस्त्यावर राहतात. मुलाने पाेलिसांना सांगितले, मुलीच्या नातेवाइकांनी त्याला काही दिवसांपूर्वी मारहाण केली हाेती. मात्र, त्याने दिलेली माहिती पोलिस तपासून पाहत आहेत. गुन्ह्याचे स्वरूप गंभीर असल्याने पाेलिस या घटनेचा विविध अंगांनी तपास करीत आहेत.

नशेबाजांचा वावरकल्याण स्टेशन परिसराला रात्रीच्या वेळी नशेबाजांचा विळखा असतो. अनेक नशेबाज  परिसरात फिरत असतात. त्यांच्याकडून यापूर्वी अनेक गुन्हे घडलेले आहेत. स्टेशन परिसराचा काही भाग हा रात्री उशिरानंतर महिलांसाठी असुरक्षित मानला जातो. 

 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळCrime Newsगुन्हेगारी