नवी दिल्ली - विमानातून तस्करी करण्यासाठी चक्क शरीरात, शूजच्या सोलमध्ये, अंतर्वस्त्रात आदी संशय न येण्यासारख्या ठिकाणी अमली पदार्थ, परदेशी चलन, सोन लपविल्याच्या शक्कला लढवल्या जातात.मात्र, काल केलेल्या कारवाईत एक अनोखी शक्कल पाहायला मिळाली. चक्कपरफ्युम बॉटल्स आणि पाऊचमध्ये परदेशी चलनातील नोटांची एक इसम तस्करी करताना आढळून आला. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सेंट्रल इंडस्ट्रीयल सिक्युरिटी फोर्स - सीआयएसएफ) एका धडक कारवाईमध्ये तब्बल ४२. ३५ लाख रुपयांच्या परदेशी चलनातील नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. अटक इसमाचे नाव मोहम्मद अर्शी असं आहे.
१९७५०० सौदी रियाल आणि २००० कुवेत दिनार हस्तगत करण्यात आल्या आहे. दिल्ली येथील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमातळावरील टर्मिनल येथे मोहम्मद अर्शी याच्यावर ही कारवाई करण्यात आली. संशयास्पद हालचालींमुळे त्याच्यावर नजर ठेवत सुरक्षा रक्षकांकडून अखेर ही कारवाई करण्यात आली.