शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: अपघातग्रस्त रुग्णांवर १ लाखापर्यंत कॅशलेस उपचार करा; बैठकीत आरोग्यमंत्र्यांचे निर्देश
2
"मुख्यमंत्री महोदय, हे फोटो पाहूनही तुम्हाला झोप कशी लागते?"; रोहिणी खडसे यांचा संताप
3
मुंबई: शेअर मार्केटमध्ये नुकसान झाले अन् तरुणाने स्वतःच्या गळ्यावर झाडली गोळी, किती लाख बुडाले?
4
पोलिसांचा पुन्हा 'वाल्मीक पॅटर्न'?; फरार PSI कासले काल स्वत:हून पुण्यात आला, अन् आज अटक झाली!
5
"म्हणजे मुलींनी सहनच केलं पाहिजे...", आताच्या मालिकांवर रेणुका शहाणे स्पष्टच बोलल्या
6
"हिंदी ही देशाची राष्ट्रभाषा, त्यामुळे ती लोकांना आली पाहिजे’’, भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळेंचं मोठं विधान    
7
Rahu Mangal Transit 2025: राहू-मंगळ षडाष्टक;'या' पाच राशींच्या आयुष्यात वाढणार अडचणी!
8
अभिमानास्पद! भगवद्गीता, नाट्यशास्त्राला UNESCO ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’मध्ये मिळालं स्थान
9
Video: Mumbai Indians च्या विजयानंतर नीता अंबानी ड्रेसिंग रूममध्ये! 1,2,3 म्हणताच सगळे ओरडले...
10
Video - प्रसिद्धीसाठी काहीही! धावत्या मेट्रोत तरुणीने वेधलं लक्ष; हँडलला लटकून केली स्टंटबाजी
11
भीषण! बुलढाण्यात खासगी बस उभ्या ट्रकला धडकली; अपघातात ३८ जखमी, तिघांची प्रकृती गंभीर
12
जगभर : रेल्वेच्या खिडकीतून बेल्जियमच्या लुना बटियन्सने पाहिली अमेरिका!
13
वैद्यकीय हयगय, डॉक्टरांचा हलगर्जीपणा; कुठेही नमूद नाही, पोलिसांना काहीच बोध होत नाही
14
पतीच्या मृत्यूचा धक्का झाला नाही सहन, शोकाकुल पत्नीनंही संपवलं जीवन, एकाच चितेवर झाले अंत्यसंस्कार
15
ज्ञानेश्वरांनी भिंत कशी चालवली? दिग्पाल लांजेकरांचं मनं जिंकणारं उत्तर, म्हणाले- "प्रत्येक गोष्टीत लॉजिक शोधायला..."
16
तुमचेही पैसे ब्लूस्मार्ट वॉलेटमध्ये अडकलेत? रिफंडसाठी स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस फॉलो करा
17
"आगीच्या लोळासमोर पडलो अन् बिग बींनी...", अशोक समर्थ यांनी सांगितला अनुभव
18
"मी अमितचा हात धरला, बॉयफ्रेंडने गळा दाबला..."; नवऱ्याचा काटा काढणाऱ्या बायकोची कबुली
19
Beed Crime: डीजेच्या आवाजाची तक्रार केली, बीडमध्ये महिला वकिलाला सरपंचाकडून बेदम मारहाण
20
५००० वर्षांपूर्वीचे 'हे' शहर आजही अर्थव्यवस्थेला लावतंय हातभार! आश्चर्यचकीत करणारी पर्यटनस्थळे

काय आश्चर्य! कॉल गर्ल म्हणून आलेली 'ती' पत्नीच निघाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 18:47 IST

पतीचा ‘तिला’ फोन : दोघांनीही दिला एकमेकांना चोप, लोकांची तोंडात बोटे

ठळक मुद्देर्फ बांधून असलेली एक महिला फोनवर बोलत असल्याचे पाहून पतीदेव तिच्यापर्यंत पोहोचला. २२ जानेवारीचा दिवस या दाम्पत्यासाठी धक्कादायक आणि आयुष्याची दिशा बदलविणारा ठरला.

अमरावती - ऐकावे ते नवलच, असे म्हणण्याची वेळ यावी अशी एक घटना बुधवारी अमरावती शहरात उघडकीस आली. नागरिकांमध्ये ती घटना प्रचंड उत्सुकतेचा विषय तर ठरलीच, परंतु सामाजिक जीवनाचा आलेख किती रसातळाला जातो आहे, हेही त्यातून अधोरेखित झाले. त्याचे झाले असे की, शहरातील उच्चभ्रू वस्तीतील एक ३८ वर्षीय पुरुष आणि ३४ वर्षीय महिलेचा आनंदाने संसार सुरू होता. बुधवार, २२ जानेवारीचा दिवस या दाम्पत्यासाठी धक्कादायक आणि आयुष्याची दिशा बदलविणारा ठरला.

बुधवारी सकाळी पत्नी पतीसोबत लाघवीपणे बोलत मैत्रिणीच्या लग्नात जायचे आहे, सायंकाळपर्यंत घरी परतेन, असे सांगून घरून निघाली. कुठलीही आडकाठी न घेता पतीरायानेही पत्नीला त्यासाठी संमती दिली. खरे तर पत्नी कधी घरून बाहेर पडते, याची पतीदेव प्रतीक्षाच करीत होते. पत्नी घरातून बाहेर गेल्याचे पाहून पतीने तात्काळ मित्राला कॉल केला. त्याच्याकडून एका कॉल गर्लचा मोबाइल क्रमांक मिळविला. तिला नियमित क्रमांकावरून त्याने संपर्क साधला. कॉल गर्लने कॉल स्वीकारला. केव्हा आणि कुठे यायचे, हे ठरले. त्यानंतर काही वेळातच कॉल गर्लचा पुन्हा कॉल आला. निश्चित पत्त्याबाबत ती विचारणा करीत होती.  तिला पत्ता माहिती नसल्याचे समजून पतीदेवाने एक लँडमार्क भेटण्याचे ठिकाण ठरविले. वर्दळीचे ते ठिकाण आहे. दोघेही तेथे पोहोचले. एकमेकांचा शोध सुरू केला. स्कार्फ बांधून असलेली एक महिला फोनवर बोलत असल्याचे पाहून पतीदेव तिच्यापर्यंत पोहोचला. काय आश्चर्य! कॉल गर्ल म्हणून आलेली ती त्याची पत्नीच निघाली.

व्हॉट्स अ‍ॅपवरुन पतीनं बोलावलेली कॉल गर्ल निघाली त्याचीच पत्नी

दोघांमध्ये घमासान सुरू झाले. पत्नीच्या अशा वागण्यावर पतीने जोरदार आक्षेप घेतला. या कारणानेच तुम्ही मला बाहेर जाऊ दिले, असा आक्षेप पत्नीनेही नोंदविला. लोक जमले होते. गर्दी वाढत होती. दोघांमध्ये काय घडले, हे एव्हाना त्यांच्याच भांडणातून स्पष्ट झाले. कुणीच मागे हटत नव्हते. उपस्थितही वाद मिटविण्याऐवजी त्याचा आनंद घेत होते. दोघांचाही राग वाढत गेला. पतीने पत्नीचे केस ओढून तिला मारहाण केली. पत्नीनेही पतीला थापडांचा प्रसाद दिला. उच्चभ्रू वस्तीत भर रस्त्यावरील हे नाट्य ज्या कारणासाठी घडत होते, त्या कारणावर अनेकांचा विश्वासच बसेना. मारून मारून दमल्यावर अखेर दोघेही घराच्या दिशेने निघून गेले. शाब्दिक चकमक मात्र जातानाही सुरूच होती. वृत्त लिहिस्तोवर या घटनेची कुठेही तक्रार झालेली नव्हती.

टॅग्स :AmravatiअमरावतीPoliceपोलिस