नवी दिल्ली - दिल्लीतील द्वारका जिल्ह्यातील विशेष पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने दोन दुचाकी चोर मित्रांना अटक केली आहे. त्यांनी आतापर्यंत वाहन चोरीच्या ९ घटनांना लगाम दिला आहे. पोलिसांच्या पथकाने त्यांच्याकडील चोरीच्या बाईक व स्कूटी जप्त केल्या आहेत. अटक चोरांपैकी एका ललित नावाच्या गर्लफ्रेंडने व्हॅलेंटाईन डेला ललितकडे बाईक नसल्याने त्यांना असा टोमणा मारला की ललित हा त्याचा साथीदार शाहिदसह दुचाकी चोरी करू लागला आणि त्याने अनेक दुचाकी चोरल्या.
पोलिसांनी अटक केलेल्या या दोन चोरट्यांनी नावे ललित आणि शाहिद अशी आहेत. दोघेही द्वारकाच्या भगवती गार्डन आणि बिंदापूर भागातील रहिवासी आहेत. पोलीस पथकाने सापळा रचून दोघांना अटक केली आहे. हे चोरटे दुचाकीवरून सेक्टर ३ मधील जेजे कॉलनीत फिरत असताना पोलिसांनी अटक केली आहे. सुरुवातीच्या तपासात पोलीस पथकाला हे दोघे चोरटे ज्या बाईकवर फिरत होते ती चोरीस गेली असल्याचे आढळले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या चौकशीनंतर चोरीच्या ८ दुचाकी आणि स्कूटी जप्त केल्या. दोघांनीही द्वारकाच्या वेगवेगळ्या पोलीस ठाणे हद्दीतून ही चोरी केली केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत की, त्यांनी वाहन चोरीच्या आणखी किती गुन्हे केले आहेत. याबाबत पोलीस शोध घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. स्वत: कडे बाईक - स्कूटी नसल्याचे गर्लफ्रेंड टोमणा मारत असे. याचा राग मनात ठेवून त्यांनी वेगवेगळ्या बाईक आणि स्कूटीवरून गर्लफ्रेंड फिरवण्याचा प्लॅन केला. म्हणून त्यानंतर या दोघांनी एकत्र मिळून वाहन चोरीस सुरुवात केली असल्याचे पोलिसांना चोरट्यांनी सांगितले.