सध्या सोशल मीडिया वापराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल करुन अनेकांना फसवल्याची प्रकरणे समोर आली आहेत, अश्लील व्हि़डिओ कॉल करुन अनेकांना ब्लॅकमेल केले जात आहे. या प्रकरणी सायबर सेलने सुचनाही जारी केल्या आहेत. आता या प्रकरणी फसवणुकीसाठी गुन्हेगार वेगळ्या मार्गाचा अवलंब करत असल्याचे समोर आले आहे.
अशीच एक घटना समोर आली आहे.आधी व्हिडीओ कॉल करून यूजरच्या चेहऱ्याचा व्हिडीओ बनवण्यात आला. ज्यामध्ये व्हिडिओ कॉलच्या पलीकडे असलेली मुलगी तिचे कपडे काढते. व्हिडिओ कॉलमध्येही त्याचा चेहरा दिसत असल्याने स्क्रीन रेकॉर्डिंगमध्येही त्याचा चेहरा दिसतो. यानंतर त्या व्यक्तीला ब्लॅकमेलिंगचे फोन येऊ लागले. मात्र, त्याने पैसे देण्यास नकार देत व्हिडिओ अपलोड करण्यास सांगितले. दोन दिवसांनंतर, त्याला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला ज्यामध्ये कॉल करणाऱ्याने आपली ओळख सायबर सेलचा अधिकारी म्हणून दिली.
यावेळी त्या अधिकाऱ्याने तो अश्लील व्हिडिओ त्याला शेअर केला आणि हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे सांगितले. यावेळी त्याने व्हिडिओ डिलीट करण्साठी 10 हजार रुपयांची मागणी केली. यावेळी त्या व्यक्तीने पैसे दिले. काही वेळातच पुन्हा फोन आला आणि व्हिडिओ डिलीट करण्यासाठी पुन्हा पैशांची मागणी करण्यात आली.
फसवणुकीचा हा प्रकार सुरूच राहिला. बऱ्याच दिवसांनी त्या व्यक्तीला हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे लक्षात आले. आपण सायबर सेलचा अधिकारी असल्याचा दावा करून हा व्हिडिओ व्हायरल करत असल्याचा दावा त्यांनी केला होता. हा व्हिडिओ डिलीट करण्साठी पैशांची मागणी केली जात आहे. अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत.
Video - लेक झाला हैवान! जन्मदात्या आईलाच केली बेदम मारहाण, घराबाहेर काढले, केस ओढले अन्...
जर तुम्हाला अनोळखी व्हिडिओ कॉल आला असेल आणि त्याने तुमचा व्हिडिओ रेकॉर्ड केला असेल तर घाबरण्यासारखे काही नाही. घोटाळेबाजांनी पैसे मागितले तरी त्यांना पैसे देऊ नका. असे व्हिडिओ कोणत्याही साइटवर अपलोड केले जात नाहीत कारण स्कॅमरला स्वतः आयपी अॅड्रेस ट्रॅकिंगमध्ये अडकण्याची भीती असते. तुम्ही सायबर सेलमध्येही याबाबत ऑनलाइन तक्रार करू शकता.