सदानंद नाईक
उल्हासनगर : कॅम्प नं-४, श्रीरामनगर येथील शिधावाटप दुकानातील गहू व तांदूळ जादा किंमतीने काळा बाजारात विक्री केल्या प्रकरणी दुकानदार मधुकर सुरवाडे यांच्या विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. गोरगरीब व गरजूंचे अन्नधान्य जादा किमंतीला विकून शासनाची फसवणूक केल्याची प्रतिक्रिया शिधावाटप अधिकारी शशिकांत पाटसुते यांनी दिली.
उल्हासनगर कॅम्प नं-४ श्रीरामनगर परिसरात शासनाचे क्रं- ४०फ, २११ हे शिधावाटप दुकान असून दुकानाचे प्रधिकारपत्रधारक मधुकर सुरवाडे हे आहेत. दुकानदार सुरवाडे यांनी गोरगरीब शिधापत्रिकाधारकांना शासनाकडून आलेला गहू व तांदुळाचे वाटप न करता, परस्पर जादा किंमतीने काळ्या बाजारात विक्री करीत असल्याची माहिती व तक्रार शिधावाटप अधिकारी शशिकांत पाटसुते यांना मिळाली होती. त्यानुसार धाड टाकून शिधावाटप दुकानदार मधुकर सुरवाडे यांचे पितळ उघड पाडले. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यावर शिधावाटप दुकानदार मधुकर सुरवाडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. यापूर्वी शिधावाटप दुकानातील गहू व तांदुळाची जादा किंमतीने काळ्या बाजारात विक्री होत असल्याचा प्रकार उघड झाला असून शहरातील शिधावाटप दुकानदार भोवती संशयाचे वातावरण निर्माण झाले.
शहरातील बहुतांश शिधावाटप दुकानदारातील वजन काटा बनावट असून गोरगरीब नागरिकांना कमी धान्य दिले जाते. अशी चर्चाही शहरात रंगली आहे. वजन मापे विभागाने शिधावाटप दुकानाच्या वजन काट्याची तपासणी काही वर्षापूर्वी करून खोटे वजन मापे काटे ठेवणाऱ्या अनेक शिधावाटप दुकाना विरोधात गुन्हाही दाखल केला होता. या पाश्वभूमीवर सरसगट सर्वच शिधावाटप दुकानातील वजन मापे यांची तपासणी करणे करण्याची मागणी होत