हनुमंत देवकरचाकण : चाकण औद्योगिक क्षेत्रातील खराबवाडी ( ता.खेड ) येथील आगरवाल पॅकेजिंग कंपनी व कुरुळी गावच्या हद्दीतील दुसरी मिताली पॅकेजिंग प्रा.लि. अशा दोन ठिकाणच्या कंपन्यांवर वर दस्तुरखुद्द पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी छापा टाकून धडक कारवाई केली. त्यात पोलीस व महसूल यंत्रणेला कळवत कच्चा व पक्का असा अंदाजे चार मोठी गोडाऊन भरून कोट्यवधी रुपयांचा माल जप्त केला आहे.
....जेव्हा दस्तुरखुद्द पर्यावरण मंत्री प्लास्टिक कंपन्यांवर टाकतात छापा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 5:31 PM
चाकण परिसरातील दोन कंपन्यांवर दस्तुरखुद्द पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी छापा टाकून धडक कारवाई केली.
ठळक मुद्देकोट्यवधींचा प्लास्टिक माल जप्त प्लॅस्टिक उत्पादन होत असल्याचे निष्पन्न