शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

चार मुली असताना वंशाचा दिवा हवा, म्हणून चार वर्षांच्या मुलाचे अपहरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2023 8:39 AM

कल्याण रेल्वे स्थानकातील घटना, रेल्वेतून नाशिकला जात असताना आरोपीला अटक

लोकमत न्यूज नेटवर्ककल्याण : कल्याण रेल्वेस्थानकावरील वेटिंग रूममधून सकाळी चार वर्षांच्या मुलाचे एकाने अपहरण केले. याप्रकरणी कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने तपास सुरू करून अवघ्या आठ तासांत मुलाचा शोध लावला आणि त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी अपहरणकर्ता कचरू वाघमारे याला अटक केली. धक्कादायक म्हणजे कचरू वाघमारे याला चार मुली आहेत. वंशाचा दिवा आणि मुलाच्या हव्यासापोटी त्याने मुलाचे अपहरण केल्याची धक्कादायकबाब तपासात समोर आली.

कल्याण रेल्वेस्थानक परिसरातील करण गुप्ता आणि त्याची पत्नी शुभांगी गुप्ता हे दोघे मजुरीचे काम करतात. त्यांना चार वर्षांचा मुलगा आणि दोन वर्षांची मुलगी अशी दोन मुले आहेत. आज सकाळी कपडे धुण्यासाठी करण आणि शुभांगी कल्याण रेल्वेस्थानकावरील वेटिंग रूममध्ये आले. मात्र, साबण नसल्याने आपल्या दोन्ही मुलांना बाहेर  खेळायला सोडून ते जोडपे साबण आणण्यासाठी स्थानकाबाहेर गेले. यावेळी त्यांच्या मुलांसोबत आणखी चार मुली त्या ठिकाणी खेळत होत्या. त्याठिकाणी एक जोडपे होते. त्यांना आपल्या मुलांवर लक्ष ठेवण्यास सांगून करण आपल्या पत्नीसह साबण आणण्यासाठी गेला. साबण घेऊन परतल्यानंतर त्यांना धक्काच बसला. अथर्व व त्यांच्यासोबत खेळत असलेल्या चारही मुली तिथे नव्हत्या.

करणने आजुबाजुला आपल्या मुलाचा शोध घेतला. मात्र, मुलगा आढळून आला नाही. त्याने कल्याण रेल्वे गुन्हे पोलिस ठाणे गाठले. कल्याण रेल्वे गुन्हे शाखेने तत्काळ या मुलाचा शोध सुरू केला. स्थानक परिसरातील सीसीटीव्ही तपासले. मुलाच्या शोधासाठी पथके नेमली. सायंकाळी आठ वाजताच्या सुमारास  एक जण अथर्वला घेऊन कल्याण रेल्वे स्थानक फलाटावरून जात असल्याचे आढळून आले. ही व्यक्ती नाशिकला जाणारी ट्रेन पकडण्याच्या घाईत होती. रेल्वे गुन्हे शाखेच्या पथकाने या व्यक्तीवर झडप घालत त्याला ताब्यात घेतले. त्याच्या तावडीतून  मुलाची सुटका केली. 

चौकशीदरम्यान त्याचे नाव कचरू वाघमारे असल्याचे उघड झाले. कचरू वाघमारे याला चार मुली आहेत. त्याला मुलगा हवा होता. मुलाच्या हव्यासापोटी त्याने चार वर्षांच्या अथर्वचे अपहरण केल्याचीबाब समोर आली. पोलिसांनी कचरूला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला आहे.