अर्णब गोस्वामींची दिवाळी कुठे? निर्णय अलिबाग सत्र न्यायालयाच्या हातात
By पूनम अपराज | Published: November 9, 2020 05:59 PM2020-11-09T17:59:47+5:302020-11-09T18:00:47+5:30
Arnab Goswami :जामीन अर्जावर चार दिवसांत निकाल देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले तर दुसरीकडे अर्णब यांच्यावतीनं सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल आला आहे.
मुंबई - अलिबागमधील वास्तुविशारद अन्वय नाईक व त्यांच्या आईने केलेल्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी अटक झाली असून त्यांना स्थानिक कोर्टाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. अटकेविरोधात गोस्वामी यांनी हायकोर्टात धाव घेतली असून आज मुंबई हायकोर्टाने अर्णब यांचा अंतरिम जामिनाचा अर्ज फेटाळला आहे. त्यांना सत्र न्यायालयात जाण्याचे हायकोर्टाने सुचवले आहे. त्यामुळे मुंबई हायकोर्टाकडून अर्णब यांना दिलासा मिळालेला नाही. त्यामुळे अर्णब गोस्वामींची यंदाची दिवाळी तळोजा कारागृहात की घरी?, याचा फैसला आता अलिबागसत्र न्यायालय करणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने अंतरिम दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर अर्णब यांनी उच्च न्यायालयाचा निर्णय येण्याआधी काही वेळ आधीच अलिबाग सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे. अर्णब यांच्या जामीन अर्जावर चार दिवसांत निकाल देण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले तर दुसरीकडे अर्णब यांच्यावतीनं सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल आला आहे. अन्यव नाईक आत्महत्या प्रकरणातील रायगड पोलिसांनी जिल्हा सत्र न्यायालयात पुनर्निरीक्षण अर्ज दाखल केला होता. त्यावर आज सुनावणीचे कामकाज आज पार पडले असून गोस्वामी यांच्या जामीन अर्जावर उदया सुनावणी होण्याची शक्यता आहे. तसेच पुनर्निरीक्षण अर्जावर देखील कामकाज होणार आहे.
Breaking - Arnab Goswami : अर्णब गोस्वामींचा अंतरिम जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला; आता मदार सेशन्स कोर्टावर
तपास अधिकाऱ्याने न्यायदंडाधिकारी कोर्टाला अवगत करून पुन्हा तपास सुरू केला, हे कोणत्याही प्रकारे बेकायदा म्हटले जाऊ शकत नाही. आरोपीला जसे मूलभूत हक्क असतात, तसेच पीडितालाही असतात असे निरीक्षण उच्च न्यायालयाने आजच्या निकालात नमूद केले आहे. तसेच अलिबाग न्यायदंडाधिकारी कोर्टाने प्रकरण बंद करण्यापूर्वी फिर्यादी नाईक कुटुंबाला नोटीस दिली नाही. त्याचप्रमाणे संरक्षण याचिका दाखल करण्याची संधीही दिली नाही. म्हणूनच फिर्यादी अक्षता नाईक यांनी तपासासाठी वारंवार राज्य सरकारकडे पाठपुरावा केला असे देखील उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
Arnab Goswami : अबू सालेमवर जेथे हल्ला झाला, तेथे तळोजा कारागृहात अर्णब यांना केलीय कैद
अन्वय नाईक व कुमुद नाईक आत्महत्या प्रकरणात या दोघांना आत्महत्यांसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णव गोस्वामी, नितीश सारडा आणि फिरोज शेख हे तिघे ४ नोव्हेंबरपासून आहेत अटकेत. मात्र आज मुंबई हायकोर्टाने अर्णब आणि फिरोज या दोघांचे जामीन अर्ज फेटाळून लावले आहेत. दरम्यान अर्णब यांनी जामिनासाठी अलिबाग सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. त्यामुळे अर्णब यांनी यंदाची दिवाळी जेलमध्ये की घरी याचा सर्वस्व निर्णय सत्र न्यायालयाच्या हातात आहे. तसेच महत्वाचे म्हणजे शनिवारी सुनावणीदरम्यान आम्ही अशी विनंती मान्य करून अंतरिम सुटकेचा आदेश केला तर कायदेशीर प्रक्रियेने कनिष्ठ न्यायालयांना असलेले महत्त्व कमी केल्यासारखे होईल. शिवाय नियमित जामिनाचा पर्याय असला तरी थेट मुंबई हायकोर्टात जाऊन जामीन मिळवता येऊ शकतो, असा चुकीचा पायंडा पडणार नाही का?’ असा सवाल न्या. शिंदे यांनी केला होता.