अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या वडिलांनी त्याची गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीवर (Rhea Chakraborty) गंभीर आरोप करताना एफआयआरमध्ये सुशांतच्या खात्यातून 15 कोटी रुपये गायब असल्याचे म्हटले होते. एवढी मोठी रक्कम पाहिल्यावर या प्रकरणात ईडीनेही उडी घेतली होती. या कथित पैशांच्या व्यवहाराचा शोध ईडी घेत आहे. तर CBI कडून तपासाचे केंद्र आता एनसीबीकडे गेले आहे. ड्रग्ज प्रकरणी रियाच्या भावाला आणि सुशांतच्या कर्मचाऱ्याला अटक झाली आहे. आता रियालाही अटक होण्याची शक्यता आहे. याचबरोबर एका वृत्तवाहिनीने केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये सुशांतचे 15 कोटी रुपये कुठे 'गायब' झाले? याचा खुलासा झाला आहे.
आजतक (इंडिया टुडे)ने हे स्टिंग ऑपरेशन केले आहे. एका मुलाखतीमध्ये रिया चक्रवर्तीने लेखक आणि दिग्दर्शक रुमी जाफरी आणि निर्माते वासू भगनानी यांच्याकडून मिळालेल्या ऑफरविषयी सांगितले होते. ''सुशांत आणि वासू सर यांच्यासोबतच्या बैठकीत 15 कोटी रुपयांची सायनिंग अमाऊंट देण्यावर समझोता झाल्याची शक्यता आहे. सुशांत यावरून खूप खूशही होता. ही फेब्रुवारी महिन्यातील गोष्ट होती.'', असे रिया म्हणाली होती. तसेच या डीलबाबत सुशांतसोबत कोणतेही अॅग्रीमेंट साईन झाले नव्हते. या मुव्हीमध्ये मी देखील हिरोईन असणार होते. दुर्भाग्याने लवकरच लॉकडाऊन झाले. मे पासून शुटिंग सुरु होणार होते. अॅग्रीमेंटवर काम मार्च, एप्रिलमध्ये होणार होते. मात्र, कोरोनामुळे या गोष्टी लांबल्या आणि कोणताही व्यवहार झाला नाही, असा दावा रियाने केला होता.
निधड्या भारताची सिक्रेट फोर्स; मोदींच्या दूताची लडाखमध्ये शहीद जवानास मानवंदना
यावर इंडिया टुडेच्या टीमने स्टिंग ऑपरेशन करत रूमी जाफरी यांच्याशी संपर्क साधला. जाफरी यांचीही सीबीआय, ईडीकडून चौकशी केली जात आहे. स्टिंग ऑपरेशनमध्ये जाफरी यांनी सुशांतसोबत एका फिल्म प्रोजेक्टवर चर्चा केल्याचे कबुल केले आहे. तसेच सुशांतसोबत रियादेखील असणार होती. मात्र, लॉकडाऊनमुळे पुढे काहीच झाले नाही, असे ते म्हणाले.
15 ते 17 कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याचे बोलले जात आहे, खरे का? असा प्रश्न विचारताच त्यांनी इंडस्ट्रीमध्ये मोठ्यातल्य़ा मोठ्या स्टारलाही कोणताही निर्माता 15 कोटी रुपये देत नाही. सायनिंग सोडा, पैसे का द्यावेत? अॅग्रीमेंटही झाले नव्हते. हे सुशांतचे दुर्भाग्य होते, की लॉकडाऊन झाला असे ते म्हणाले. हा व्यवहार तोंडी ठरला होता. औपचारिक पद्धतीने साईन नसताना 15 कोटी रुपये देण्याचा प्रश्नच येत नव्हता. कोणत्याही अभिनेते किंवा कोस्टारना पैसे हे हप्त्या हप्त्याने दिले जातात. अॅग्रीमेंटवेळी 10 टक्के, प्री प्रॉडक्शनवेळी 5 टक्के, उर्वरित रक्कमही अशाच पद्धतीने देण्यात येते, असे ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या...
दोन केमिकल फॅक्टरींना भीषण आग; आग्र्यामध्ये हवाई दलाची मदत मागितली
Video: भारताकडे अभेद्य शक्ती! DRDO ला मोठे यश; हाइपरसोनिक मिसाईलची चाचणी
Video: 100 लष्करी वाहने, 1000 सैनिक; घुसखोरीत हरले म्हणून चीनचा सीमेवर युद्धसराव
Tata Harrier चे नवे व्हेरिअंट लाँच; MG Hector, क्रेटाला देणार थेट टक्कर
"7 रुपयांत 100 किमी"! हैदराबादच्या कंपनीने अॅटम बॉम्बच फोडला; मोटरसायकलची किंमत 50 हजार