लातूर : आई-वडिलांच्या वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाच्या तांत्रिक मंजुरीसाठी आठ हजारांची लाचेची मागणी करुन, ती स्वत: स्विकारताना लातूर येथील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील एका सहायक अधीक्षकाला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी दुपारी रंगेहाथ पकडले. याबाबत एमआयडीसी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनी सांगितले, लातूर येथील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात सहायक अधीक्षक म्हणून अभिमन्यू धाेंडिबा सुरवसे वय ५१ रा. नाथनगर, लातूर याने तक्रारादाराच्या आई-वडिलांचे उपाचाराचे ३ लाख १२ हजार ५६४ रुपयांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती देयकाची तांत्रिक मंजुरी करुन घेताे म्हणून बीलाच्या ३ टक्के प्रमाणे शासकीय शुल्क ऑनलाईन भरावे लागेल व शासकीय शुल्काव्यतिरिक्त बीलाच्या ५ टक्के याप्रकरणे लाचेची मागणी केली.
दरम्यान, तडजाेडीअंती ८ हजार लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. याबाबत तक्रारदाराने लातूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेत तक्रार दाखल केली. तक्रारीची शहनिशा केल्यानंतर एसीबीच्या पथकाने गुरुवारी दुपारी लातूर येथील जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयात सापळा लावला. तक्रारदार हा लाचेची रक्कम घेवून कार्यालयात गेला असता, पंचासमक्ष हाताचा इशारा करुन तक्रारदाराला सदरची रक्क्म कपाटात ठेवण्यास सांगून स्वत: स्विकारली. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अभिमन्यू सुरवसे याला रंगेहाथ पकडले. याप्रकरणी एमआयडीसी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. असे एसीबीचे उपाधीक्षक माणिक बेद्रे यांनी सांगितले.
सदरची कारवाई लाचलुचपतचे पाेलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे, पाेलीस हवालदार संजय पस्तापुरे, पाेलीस नाईक चंद्रकांत डांगे, माेहन सुरवसे, शिवकांता शेळके, संताेष गिरी, शिवशंकर कच्छवे, आशिष क्षीरसागर, दिपक कलवले, रुपाली भाेसले, चालक राजू महाजन यांच्या पथकाने केली.