अल्पवयीन मुलगी अंघोळ करत असताना नराधम घरात घुसला अन् केला बलात्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 08:56 PM2020-07-06T20:56:13+5:302020-07-06T20:58:46+5:30
मुलीने पालकांसोबत जाऊन रातीबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.
भोपाळ - १५ वर्षीय मुलीवर २२ वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याने मध्यप्रदेशची राजधानी भोपाळ शहरात खळबळ माजली आहे. रातीबड परिसरात एका ओळखीतील व्यक्तीनं घरात घुसून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. घरात कोणीही नसताना आरोपी त्याच संधीचा फायदा घेऊन घरात घुसला. त्यावेळी पीडित मुलगी अंघोळ करत होती. ही घटना शनिवारी सकाळी ११ वाजता घडली. मुलीने पालकांसोबत जाऊन रातीबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. आरोपीचे नाव सुधामा असं आहे.
पीडित मुलगी बाथरुममध्ये अंघोळ करत असतानाच नराधम घरात घुसला होता. त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले आणि सोबत येण्यास सांगितले. त्यावर मुलीने सोबत जाण्यास नकार दिला. त्यानंतर याबाबत कोणास सांगितल्यास भयानक परिणाम होतील अशी धमकी त्याने तरुणीस दिली. मुलीने आरडाओरडा केल्यानंतर कुटुंबातील सदस्य घराकडे धावत येताच आरोपीने पळ काढला. आरोपी पीडित मुलगी राहत असलेल्या इमारतीत काम करतो. तिचे वडील देखील त्याच इमारतीत कामगार म्हणून काम करतात. शनिवारी सकाळी तिचे पालक काही कामानिमित्त बाहेर गेले आणि भाऊ त्याच परिसरात राहणाऱ्या मित्राच्या घरी गेला. त्यावेळी घरी मुलगी एकटीच होती. मुलीने आठवीपर्यंत शिकून शाळा सोडली आहे.
घडलेला सर्व प्रकार मुलीने आई - वडिलांना सांगितला. त्यानंतर रातीबड पोलीस ठाण्यात मुलीच्या आई - वडिलांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून पोलिसांनी आरोपी सुधामाला बेड्या ठोकल्या आहेत.
अन्य महत्वाच्या बातम्या...
जेवण दिले नाही म्हणून मुलाने आईवर झाडली गोळी अन् घेतला जीव
साखरपुडा झाल्यानंतर होणाऱ्या पत्नीवरच केला बलात्कार, पोलिसांकडून गुन्हा दाखल
मातृत्वाला काळिमा! अंगावर एकही कपडा नाही, अंगाला रक्त लागलेलं अन् नाळसह आढळले एक दिवसाचे बाळ
कोरोना संभाव्य म्हणून बसमधून फेकलेल्या १९ वर्षीय तरुणीचा मृत्यू, नातेवाईकांनी केला आरोप
कोल्ड्रिंक्समधून गुंगीचे औषध पाजले; घरी बोलावून चौघांनी अब्रू लुटली
Breaking - Sushant Singh Rajput Suicide : चित्रपट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी वांद्रे पोलीस ठाण्यात दाखल
विकास दुबेची माहिती देणाऱ्यास अडीच लाखांचे बक्षीस देणार UP पोलीस
पांडवकडा धबधब्यावर जाणं पर्यटकांना भोवल, ५९ जणांवर पोलिसांची कारवाई