मनीषा म्हात्रे
मुंबई - माहिमच्या रहिवाशी असलेल्या रक्षिता मेहता आणि त्यांचा त्यांचा मुलगा शरयु यांनी त्यांची नुकतीच जन्मलेली तीन जर्मन शेफर्ड पिल्ले गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी मुंबईपोलिसांना दिली आहे. शिराज़, नाॅयर आणि वोडका असे त्यांचे नाव आहे. व्हिस्की (नर) आणि ब्रॅण्डी (मादी) जातीच्या श्वानाचा वापर अमली पदार्थ विरोधी पथक आणि गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी करण्यात येणार आहे. याविषयी रविवारी मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी ट्ट्विटद्वारे माहिती दिली. तर, श्वान पोलीस दलात सहभागी झाल्यामुळे मला जवानाच्या आईसारखे वाटल्याची भावना रक्षीताने ट्ट्विटद्वारे व्यक्त केली आहे. माहिमच्या रहिवासी असलेल्या मेहता यांचा इन्फ्रास्ट्रक्चरचा व्यवसाय आहे. त्यांच्याकड़े १५ जर्मन शेफर्ड प्रजातीचे श्वान आहेत. विविध माद्यांची नावे त्यांना देण्यात आली आहेत. दोन महिन्यांपूर्वी, ब्रॅण्डीने त्यांच्या डहाणू फार्म हाऊसवर पाच पिल्लांना जन्म दिला. राशिता यांच्या म्हणण्यानुसार, ही पिल्ल खरोखरच गोंडस होती आणि पुष्कळ लोक दत्तक घेण्यासाठी त्यांच्याकडे येत होते परंतु त्यांनी ते दिले नाही. दहा दिवसापूर्वी त्यांच्या एका नातेवाईकाने त्यांना सुचवले की जर्मन शेफर्ड्स उत्कृष्ट स्निफर श्वान म्हणून ओळखले जातात आणि गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना ते खूप मदत करतात."जेव्हा आम्ही याबद्दल ऐकले, तेव्हा मी आणि माझा मुलगा शौर्य यांनी तातडीने या पिल्लांना देशाची सेवा देण्यासाठी मुंबई पोलिसांना देण्याचे ठरविले. आणि पोलिसांसोबत संपर्क साधत त्यांच्यासमोर याबाबतचा प्रस्ताव ठेवला. हे ऐकून अधिकारी खूप खूष झाले आणि त्यांनी लगेचच ते मान्य केले व आपल्या वरिष्ठांनीही आनंदाने होकार देण्याची परवानगी घेतली. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या श्वानपथकास सूचित केले गेले. त्यांनी तातडीने मेहता यांच्याशी संपर्क साधत आणि त्यांच्या पिल्लांना घेण्यासाठी त्यांच्या डहाणूच्या फार्म हाऊसकडे आले. अवज्ञा आठवड़्याभरात ही प्रक्रिया पार पड़ल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई पोलीस दल हे देशात सर्वोत्तम आहे. माझे श्वान देशसेवेसाठी दलात सहभागी होत असल्याचा अभिमान व्यक्त करत, त्यामुळे मला जवानाची आई असल्यासारखे वाटत असल्याचे रक्षिता यांनी सांगितले. मेहतांकडे अद्याप व्हिस्की आणि ब्रॅण्डीची दोन इतर पिल्ले आहेत आणि ती ते पोलीस दलाला देण्याचा विचार करीत आहेत. "ते दोन महिने जुने आहेत आणि आमचे व्यावसायिक प्रशिक्षक त्यांना प्रशिक्षण देतील. जर्मन शेफर्ड हे मादक पदार्थ आणि आरडीएक्स शोधण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि म्हणूनच ते आमच्या वापरासाठी योग्य आहेत. हे कुत्री मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विभागासाठी वापरता येतील," असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी देखील या तिन्ही श्वानांना मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी योग्य पद्धतीने प्रशिक्षित करण्याचे आश्वासित केले आहे.