लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अनेकांची मालमत्ता बळकावून कोट्यवधी रुपये हडपणारा कुख्यात गुंड मंगेश कडव फरारीच्या काळात कुठे कुठे होता, त्याला कोणत्या साथीदारांनी मदत केली, त्याचा तपास आता गुन्हे शाखा करत आहे. दरम्यान, मंगेश कडवच्या घरून वेगवेगळ्या नावांचे अनेक कोरे स्टॅम्प जप्त करण्यात आले आहेत.मंगेश कडव याच्याविरुद्ध अंबाझरी, सक्करदरा, बजाजनगर, हुडकेश्वर आणि सीताबर्डी पोलिस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. जमीन देण्याच्या नावावर, राजकीय पद देण्याचे आमिष दाखवून आणि नोकरीचे आमिष दाखवूनही मंगेश कडवने अनेकांची फसवणूक केली आहे. मंगेश कडवने त्याच्या साथीदारांच्या माध्यमातून अनेकांची कोट्यवधी रुपयांची मालमत्ताही बळकावली आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध आतापर्यंत अंबाझरी, सक्करदरा, बजाजनगर, हुडकेश्वर आणि सीताबर्डी पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. पहिला गुन्हा दाखल होताच तो फरार झाला. पोलिसांना त्याने एक आठवडा झुलविले. हुडकेश्वरच्या गुन्ह्यात मंगेश कडवची पत्नी रुचिताला आरोपी बनवून पोलिसांनी तिला अटक केल्यामुळे कडववर प्रचंड दबाव निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर त्याला बुधवारी गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथक तसेच युनिट चारच्या पथकाने अटक केली. तो सध्या कस्टडीत आहे.दरम्यान, फरारीच्या कालावधीत तो कुठे लपून बसला होता, त्याला फिरण्यासाठी सपाटे नामक व्यक्तीने कार दिली होती, असे प्राथमिक तपासात पुढे आले आहे. कडवला बालाघाट, चंद्रपूर, वरोरा, गडचिरोली आणि मुंबईला नेण्या-आणण्यासाठी कोणी कोणी मदत केली ते अद्याप उघड झालेले नाही. पोलिसांना त्याच्या काही साथीदारांची नावे कळाली असून पोलिस आता त्यांचीही चौकशी करीत आहेत. त्यामुळे त्याच्या साथीदारांमध्ये खळबळ उडाली आहे.कडवच्या पापाच्या कमाईत नेते म्हणवून घेणाऱ्या काही जणांची हिस्सेवाटणी होती, अशीही माहिती आहे. त्यांच्यामुळेच तो इतका निर्ढावला होता. चौकशीत हे बाहेर येऊ शकते, याची कल्पना असल्यामुळे मंगेश कडवच्या साथीदारांची धावपळ वाढली आहे.दरम्यान, कडवला पोलिसांनी अटक केल्यामुळे पीडितांनी मोठ्या प्रमाणावर गुन्हे शाखेच्या कार्यालयात धाव घेतली आहे. त्यामुळे कडवविरुद्ध आणखी अर्धा डझन गुन्हे दाखल होणार, हे स्पष्ट आहे.कोरे स्टॅम्प, चेक जप्तगुन्हे शाखेच्या पथकाने मंगेश कडवच्या बजाजनगरातील, भरतनगरातील सदनिकेत झाडाझडती घेतली. तेथून मोठ्या प्रमाणावर कोरे स्टॅम्प, चेक, बँकेचे पासबुक, चेक बुक आढळले. पोलिसांनी ते जप्त केले आहे.
कुख्यात गुंड मंगेश कडवला कुणी दिला आश्रय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2020 10:04 PM
अनेकांची मालमत्ता बळकावून कोट्यवधी रुपये हडपणारा कुख्यात गुंड मंगेश कडव फरारीच्या काळात कुठे कुठे होता, त्याला कोणत्या साथीदारांनी मदत केली, त्याचा तपास आता गुन्हे शाखा करत आहे. दरम्यान, मंगेश कडवच्या घरून वेगवेगळ्या नावांचे अनेक कोरे स्टॅम्प जप्त करण्यात आले आहेत.
ठळक मुद्देसाथीदार रडारवर : गुन्हे शाखेकडून चौकशीआणखी तक्रारी दाखल