शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’चे पैसे पोहोचले भावांच्या खात्यात; आणखी एक फ्रॉड, हडपले लाखो रुपये
2
"माझी बाहुली हरवली म्हणून भोकाड पसरणारे..."; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंचा पलटवार
3
तिरुपती लाडू वादावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी; याचिकाकर्त्यांने सीबीआय चौकशीची मागणी केली
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रत्येक काम आत्मविश्वासाने यशस्वीपणे पूर्ण करू शकाल
5
काेचिंग क्लास चालक तीन भावांचा मुलीवर अत्याचार; तिघांनाही अटक
6
निवडणुका वेळेवरच ! पण अधिकाऱ्यांच्या आता बदल्या का नको...
7
KKK 14 Winner: करणवीर मेहरा झाला KKK 14 चा विजेता, गश्मीर महाजनीची संधी थोडक्यात हुकली
8
जुन्या सरकारांमुळे महाराष्ट्राचे नुकसान; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मविआवर टीका
9
‘किल्लारी’नंतर ३१ वर्षांत भूकंपाचे तब्बल १२५ धक्के; भूगर्भातून आवाज येण्याचे प्रमाणही वाढले 
10
‘मन की बात’ म्हणजे देवदर्शन; पंतप्रधान नरेंद्र मोदी; देशातील लोक सकारात्मक माहितीसाठी भुकेले 
11
भारतीय महिलांचा परदेशात होतोय हुंड्यासाठी छळ; पती होतोय गायब
12
यूपीत ११ जिल्ह्यांना पुराचा वेढा; २० लोकांचा मृत्यू, बिहारच्या १३ जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती
13
राजू शेट्टी पवईतून ठरले ‘विजयी’; म्हाडाच्या लॉटरीत अभिनेत्री संस्कृती बालगुडे अपात्र
14
पंतप्रधान सत्तेतून पायउतार होईपर्यंत मी मरणार नाही : खरगे, चक्कर येऊनही केले भाषण
15
चंद्राच्या सर्वात प्राचीन विवरात उतरले चांद्रयान-3; शास्त्रज्ञांनी केले विश्लेषण, विवर ३.८५ अब्ज वर्षे जुने?
16
‘पूर्वप्राथमिक’साठी राज्याचे धाेरण तयार; पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी होणार
17
बापू, तुम्ही पुन्हा भेटाल तर किती बरे होईल!
18
कमला हॅरिस, डोनाल्ड ट्रम्प, कुत्रे-मांजरे आणि तुम्ही-आम्ही!
19
‘लाडकी बहीण’ योजनेचे पैसे तुम्हाला आले की नाही? तिसरा हप्ता मिळण्यास झाली सुरुवात
20
"नवीन आयुष्य मिळालं", भीषण अपघातानंतर मुशीर खानची पहिली प्रतिक्रिया; वडिलांनी मानले आभार

कोण आहे अद्वैता काला? जॅकलीनच्या सांगण्यावरून सुकेशने तिला पाठवले होते १५ लाख रूपये

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2022 5:33 PM

Advaita Kala connection with Sukesh Chandrashekhar: ईडीने सांगितलं की, सुकेश चंद्रशेखरने दिल्ली तुरूंगात राहून २०० कोटींपेक्षा जास्त रूपयांची लोकांची फसवणूक केली होती. आणि या पैशांचा वापर तो ऐशो-आरामात जगण्यासाठी आणि सिने अभिनेत्रींवर उडवण्यासाठी करत होता.

Advaita Kala connection with Sukesh Chandrashekhar: महाठग सुकेश चंद्रशेखर प्रकरणी ईडीने कारवाई करत जॅकलीन फर्मांडिस (Jacqueline Fernandez) ची ७.२५ कोटी रूपयांची संपत्ती अटॅच केली आहे. अटॅच केलेल्या संपत्तीमध्ये ७.१२ कोटी रूपयांचे बॅंकेत जमा फिक्स डिपॉझिट आहे आणि इतर काही गिफ्ट आहेत जे सुकेशने जॅकलीनला दिले होते.

ईडीने सांगितलं की, सुकेश चंद्रशेखरने दिल्ली तुरूंगात राहून २०० कोटींपेक्षा जास्त रूपयांची लोकांची फसवणूक केली होती. आणि या पैशांचा वापर तो ऐशो-आरामात जगण्यासाठी आणि सिने अभिनेत्रींवर उडवण्यासाठी करत होता. याच पैशातून त्याने साधारण ५.७१ कोटी रूपयांचे गिफ्ट दिले होते. त्यासोबतच सुकेशने जॅकलीनच्या परिवारातील लोकांनाही काही रक्कम दिली होती. जी त्याने हवाला उद्योजक अवतार सिंहच्या माध्यमातून पाठवले होते.

त्यासोबतच खास बाब म्हणजे सुकेश चंद्रशेखरने तुरूंगात बसून जॅकलीनकडून स्क्रिप्ट रायटर अद्वैता कालाला १५ लाख रूपये पाठवले होते. हे पैसे पाठवले होते कारण जॅकलीनला एका वेब सीरिज बनवायची होती आणि त्यासाठी अद्वैता कालाला कथा लिहिण्यासाठी सांगण्यात आलं होतं.

जॅकलीनने जुलै २०२१ मध्य़े अद्वैता कालासोबत स्वत:साठी एक वेब सीरिज लिहिण्याचा कॉन्ट्रॅक्ट केला होता. ज्यासाठी अद्वैता कालाने जॅकलीनला ३० लाख रूपयांची मागणी केली होती. २९ जुलै २०२१ला जॅकलीनने अद्वैताला इमेल पाठवला होता. ज्यानंतर ३० जुलै २०२१ ला अद्वैतने या प्रोजेक्टवर काम करण्यासाठी ३० लाख रूपयांची मागणी केली.

यासोबतच काम लगेच सुरू करण्यासाठी अद्वैताने १५ लाख रूपयांचा अॅडव्हान्स पाठवण्याची मागणी केली. ज्यावर होकार देत जॅकलीनने अद्वैता कालाला पत्ता विचारला आणि सांगितलं की पैसे लगेच पोहोचतील. कारण जॅकलीन मुंबईत होती आणि अद्वैता काला गुरूग्राममध्ये राहत होती.

दोन ऑगस्ट २०२१ ला जॅकलीनने अद्वैताला सांगितलं की, काही वेळाने एक व्यक्ती तिच्याकडे १५ लाख रूपये रोख घेऊन येईल. पैसे घेतल्यानंतर अद्वैत कालाने जॅकलीनला Whatsapp वर पैसे मिळाल्याची माहितीही दिली. ईडीने सांगितलं की, जॅकलीनकडून अद्वैतला कालाला देण्यात आलेले १५ लाख रूपयेही अटॅच करण्यात आले आहेत. कारण हेही पैसे सुकेश चंद्रशेखरच्या २०० कोटी रूपयांपैकीच आहेत.

कोण आहे अद्वैता काला?

अद्वैता काला एक प्रसिद्ध लेखिका आणि स्क्रिप्ट रायटर आहे. अद्वैता कालाने अनेक सिनेमांच्या कथाही लिहिल्या आहेत. अनेक टीव्ही न्यूज चॅनल्सवर ती चर्चेत सहभागी असते. अद्वैताचे वडील एक रिटायर्ड ब्यूरोक्रेट आहेत आणि एक बहीण आहे जी अमेरिकेत राहते. अद्वैता गुरूग्राममध्ये राहते. जॅकलीनकडून पैसे मिळाल्यावर काही दिवसांनी ईडीने अद्वैताला चौकशीसाठी बोलवलं होतं. 

टॅग्स :Jacqueline Fernandezजॅकलिन फर्नांडिसCrime Newsगुन्हेगारी