शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

चिथावणीखोर विधान केल्याने अटक झालेला मौलाना सलमान अझरी नक्की कोण? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2024 10:26 AM

गुजरातच्या जुनागढमध्ये केलेल्या भाषणामुळे मौलानाला मुंबईत करण्यात आली

Maulana Mufti Salman Azhari arrested: गुजरातमधील जुनागडमध्ये चिथावणीखोर भाषण देणाऱ्या मौलाना मुफ्ती सलमान अजहरीला मुंबईतील घाटकोपरमध्ये रविवारी रात्री अटक करण्यात आली. त्याच्या अटकेच्या निषेधार्थ मौलानाचे समर्थक मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याबाहेर जमले होते. मात्र, काही वेळानंतर मौलानानेच पोलीस ठाण्यातून समर्थकांना शांत राहण्याचे आवाहन केले. या दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणताना पोलिसांनी सौम्य बळाचा वापरही केला. त्याला गुजरातच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अटक केली असून त्याला गुजरातला नेण्यात आले.

कोण आहे मौलाना सलमान अझरी?

  • मुफ्ती सलमान अझरी हा सुन्नी इस्लामिक संशोधन अभ्यासक आणि प्रेरक वक्ता असल्याचे सांगितले जाते.
  • त्याने इजिप्तच्या जामिया अल-अझहरमधून इस्लामिक अभ्यासासाठी पदवी प्राप्त केली आहे.
  • जगभरात त्याचे हजारो समर्थक आणि अनुयायी आहेत. इस्लामिक विषयांवर भाषणे देण्याबरोबरच तो विविध सामाजिक-धार्मिक कार्यातही सक्रिय आहे.
  • जामिया रियाझुल जन्ना, अल-अमान एज्युकेशन अँड वेलफेअर ट्रस्ट आणि दारूल अमान या विविध संस्था व संघटनांचा तो संस्थापक आहे.

सध्या चर्चेत असलेल्या प्रकरणात मौलाना मुफ्ती सलमान अजहरी हा कलम १५३ए, ५०५, १८८ आणि ११४ अंतर्गत आरोपी आहे. अझरीने पोलीस ठाण्याबाहेर उपस्थित लोकांना सांगितले की, अतिउत्साहात कोणीही भान सोडू नका. परिस्थिती कशीही असो, मी तुमच्यासमोर आहे. मी गुन्हेगार नाही किंवा मला गुन्हा करण्यासाठी येथे आणले गेलेले नाही. मी तुम्हाला कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची विनंती करतो. तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर गोंधळ न घालता जागा रिकामी करा आणि शांततेने आपल्या घरी जा. पोलीस आवश्यक तपास करत असून मीही सहकार्य करत आहे.

पोलिसांनी यापूर्वीच दोन आयोजकांना अटक केली

अझरीने ३१ जानेवारीच्या रात्री जुनागढमधील मैदानावरील कार्यक्रमाला संबोधित केले. यावेळी त्याने एक विधान केल्याने वाद निर्माण झाला होता. त्याच्या भाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, त्यानंतर वाद निर्माण झाला होता. वाद वाढल्यानंतर पोलिसांनी FIR नोंदवला. FIRमध्ये दोन आयोजकांचीही नावे आहेत, त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यानंतर रविवारी रात्री मौलानाला अटक करण्यात आली. भाषणादरम्यान अझरी म्हणाला होता की, करबलाची शेवटची लढाई अजून बाकी आहे. काही वेळ शांतता आहे, मग मोठा आवाज होईल. त्यांनी इस्लामच्या प्रेषिताच्या शब्दांचे पालन करण्याचा आग्रह धरला आणि लब्बाक किंवा रसूलल्लाहच्या घोषणा दिल्या. त्याच्यासोबत जमावही घोषणा देत होता.

टॅग्स :ArrestअटकGujaratगुजरातMumbaiमुंबईAnti Terrorist SquadएटीएसIslamइस्लाम