शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांनी जमीन खरेदी केलेले सलीम पटेल अन् सरदार शहावली खान कोण?

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2022 9:21 PM

Nawab Malik : १९९३ बॉम्ब स्फोटातीलजन्मठेप लागलेल्या दोषी आरोपी आणि दाऊदचा साथीदाराकडून नवाब मलिकांच्या कुटुंबियांच्या नावाने कुर्ल्यातील एलबीएस मार्गावरील ३ एकर जमीन कवडीमोल भावाने खरेदी केल्याचा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला होता.

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एक महत्त्वाची घोषणा केली होती. ९ नोव्हेंबर मंगळवारी दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेऊन फडणवीस यांनी बॉम्ब फोडला. या पत्रकार परिषदेकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. अखेर दिवाळीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी बॉम्ब फोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांचा नकाब उघड केला होता. त्यानंतर आज नवाब मलिक यांना ईडीने आठ तासांच्या चौकशीअंती अटक केली. 

१९९३ बॉम्ब स्फोटातीलजन्मठेप लागलेल्या दोषी आरोपी आणि दाऊदचा साथीदाराकडून नवाब मलिकांच्या कुटुंबियांच्या नावाने कुर्ल्यातील एलबीएस मार्गावरील ३ एकर जमीन कवडीमोल भावाने खरेदी केल्याचा गौप्यस्फोट फडणवीस यांनी केला होता. सरदार शाहवली खान आणि सलीम पटेल अशी अंडरवर्ल्डच्या या गुंडांची नावे आहेत.  

२००३ साली हा सौदा सुरु झाला होता, नंतर २००५ साली हा सौदा पूर्ण झाला. २.८० एकर म्हणजेच १ लाख २३ हजार स्क्वेअर मीटर जमीन सॉलिडस इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. कंपनीने दाऊदच्या गुंडांकडून खरेदी केली. खरेदीच्या सर्व कायदेशीर कागदपत्रांवर फराज मलिक या व्यक्तीची सही आहे. ही जमीन मूळ गोवावाला यांच्या मालकीची होती. सलीम पटेल कोण आहे माहित नव्हतं का?, मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांकडून जमीन खरेदी का केली?, २० लाखांत तीन एकर जमीन तुम्हाला कशी काय दिली?, या आरोपींवर टाडा होता, तर टाडाच्या आरोपीची सगळी प्रॉपर्टी सरकार जप्त करतं. मग टाडाच्या आरोपीची संपत्ती जप्त होऊ नये म्हणून तुम्हाला ट्रान्सफर केली गेली का? असे अनेक प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले होते.  

 कोण आहे सरदार शाहवली खान?

सरदार शहावली खान हा १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा गुन्हेगार असून याला जन्मठेप लागली आहे आणि ती सर्वोच्च न्यायालयाने कायम केली. सध्या तो कारागृहागृत आहे.टायगर मेमनच्या नेतृत्त्वात फायरआर्म ट्रेनिंगमध्ये तो सहभागी झाला होता.बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि मुंबई महापालिकेच्या इमारतीत बॉम्ब कुठे ठेवायचा, याची रेकी त्याने केली. टायगर मेमनच्या घरी बॉम्बस्फोटाचे कारस्थान शिजले. त्या सर्व मिटिंगला हा उपस्थित होता. त्याला काय होणार आहे, याची संपूर्ण माहिती होती.अल हुसैनी बिल्डींग माहीममध्ये टायगर मेमनच्या घरी गाड्यांमध्ये आरडीएक्स याने भरले.माफीचे साक्षीदार आणि इतर गुन्हेगारांनी याबाबत प्रत्यक्षदर्शी पुरावा दिला, त्यामुळे त्याला जन्मठेप झाली.

कोण आहे मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल मोहम्मद सलीम इशाक पटेल उर्फ सलीम पटेल?

सलीम पटेल हा हसीना पारकरचा सहकारी आणि फ्रंटमॅन. तिच्यासोबत याला २००७ मध्ये पकडले होते. त्याला समोर करून संपत्ती बळकाविण्याचे काम ती करायची.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसnawab malikनवाब मलिकEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयDawood Ibrahimदाऊद इब्राहिमKurlaकुर्ला