वाराणसी - भोजपुरी अभिनेत्री आकांक्षा दुबे हिच्या मृत्यूचं रहस्य आता उलगडताना दिसत आहे. अद्याप पोस्टमोर्टम रिपोर्ट नसल्याने अभिनेत्रीने आत्महत्या केली का तिची हत्या झाली याबाबत पोलिसांनी भाष्य करणे टाळले. आकांक्षा दुबेचा मृत्यू ज्यादिवशी झाला त्यादिवशी तिला हॉटेलच्या खोलीपर्यंत कुणी सोडले? अभिनेत्रीसोबत तो त्या रुममध्ये १७ मिनिटे होता त्यामुळे तो व्यक्ती कोण याचा शोध पोलीस घेत आहेत. तर दुसरीकडे आकांक्षाच्या आईनं भोजपुरी गायक समर सिंह आणि त्याचा भाऊ संजय सिंह या दोघांवर आत्महत्येसाठी उकसवण्याचा प्रयत्न केल्याचा FIR दाखल केला आहे. पोलीस या दोघांचाही शोध घेत आहेत.
एकीकडे पोलीस आरोपींचा शोध घेत आहे तर दुसरीकडे आकांक्षा दुबेच्या खोलीत कोण गेले होते याबाबतही स्पष्ट सांगितले जात नाही. हा व्यक्ती खोलीतून गेल्यानंतर आकांक्षा इन्स्टाग्रामवर लाईव्ह येत रडताना दिसली. हॉटेलच्या खोलीत कोण आले होते हे जाणून घेण्यासाठी पोलीस हॉटेल सोमेंद्र रेजीडेंसी येथे पोहचून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. आकांक्षा दुबे हिचा पोस्टमोर्टम रिपोर्ट समोर येत नाही तोवर काही स्पष्टता नाही. पोलीस सूत्रांनुसार, प्राथमिकदृष्ट्या आकांक्षाने सुसाईड केल्याचं आढळून येत आहे.
काय आहे प्रकरण?आकांक्षा दुबेचा मृत्यू रविवारी सकाळी सारनाथ परिसरातील हॉटेल सोमेंद्र रेजीडेंसीच्या खोली क्रमांक १०५ मध्ये झाला होता. आकांक्षाचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला. मुंबईहून परतलेली आकांक्षा दुबेच्या आईनं तिने आत्महत्या केल्याचं नाकारले आहे. आकांक्षाच्या आईने हत्येचा आरोप भोजपुरी गायक समर सिंह आणि त्याचा भाऊ संजय सिंहवर लावला आहे.
आकांक्षा दुबेच्या आईनं आरोप केलाय की, समर सिंह आणि संजय सिंह यांनी आकांक्षा दुबेचे मागील ३ वर्षापासून कोट्यवधीचे काम करून पैसे रोखले होते. २१ तारखेला समर सिंहचा भाऊ संजय सिंहने आकांक्षा दुबेला जीवे मारण्याची धमकीही दिली होती. आकांक्षाने स्वत: मला याबाबत फोन करून माहिती दिल्याचं आईने सांगितले. त्यामुळे आता हॉटेलच्या रुममध्ये गेलेला तो व्यक्ती कोण हे शोधणे पोलिसांसमोर आव्हान आहे.