लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूतसोबत राहणारा अभिनेता सिद्धार्थ पिठाणी याने मुंबई पोलिसांना मेल केलेल्या एका ई-मेलची मदत सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीला सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यासाठी उपयुक्त ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली. मात्र हा ई-मेल लीक झालाच कसा, हा प्रश्न अनुत्तरित असून मुंबई पोलिसांनी यावर सध्या तरी उत्तर देणे टाळले आहे.
रियाविरोधात पाटणा पोलिसांना साक्ष दे, असा दबाव सुशांतच्या कुटुंबाकडून टाकण्यात येत असल्याचा आरोप पिठाणी याने एका ई-मेलमार्फत मुंबई पोलिसांकडे केला आहे. त्याला सुशांतचे नातेवाईक व एका बड्या पोलीस अधिकाऱ्याने यासाठी फोन केल्याचा दावा त्याने मेलमध्ये केला.सिद्धार्थने मंगळवार २८ जुलै २०२० रोजी हा ई-मेल वांद्रे पोलिसांना पाठविला होता. त्याच्या दुसºयाच दिवशी म्हणजे बुधवारी, २९ जुलै २०२० रोजी रिया चक्रर्तीने तिचे वकील सतीश मानेशिंदे यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयात धाव घेत सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपास पाटणा नव्हे तर मुंबई पोलिसांमार्फतच व्हावा, अशी मागणी केली. यासाठीच्या अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रांमध्ये तिने सिद्धार्थच्या ई-मेलची प्रतही जोडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सिद्धार्थने मेल मुंबई पोलिसांना पाठवला होता तर तो रियाकडे कसा पोहोचला, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. या प्रकरणी ‘लोकमत’ने परिमंडळ ९ चे पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांच्याशी संपर्कसाधला असता त्यांनी नंतर बोलतो, असे सांगत विषय टाळला.
डॉक्टरांचा जबाब नोंदविला!पाटणा पोलिसांनी त्याच्यावर उपचार करणाºया डॉक्टरचा जबाब नोंदवला आहे. ‘आम्ही गुरुवारी एका डॉक्टरचा जबाब नोंदविला असून उर्वरित दोन डॉक्टरांचा जबाब नोंदविण्याचे काम सुरू आहे’, असे पोलीस उपमहानिरीक्षक (पाटणा) संजय सिंग यांनी ‘लोकमत’ शी बोलताना सांगितले.
सुशांत बेशुद्ध असायचा, रिया पार्टी करायची!रियाला मोठमोठ्या आवाजात संगीत वाजवत दररोज पार्टी करण्याची सवय होती. ज्याचा खर्च दिवसेंदिवस वाढत जात होता. सुशांत औषधांच्या प्रभावामुळे बेशुद्ध असायचा तर रिया पार्टी करायची. याची कल्पना बॉडीगार्डने सुशांतला दिल्याचे रियाला समजले होते. त्यातच सुशांतचा फोन लागला नाही की त्याचे वडील त्याच बॉडीगार्डच्या मोबाइलवर त्याला फोन करायचे. त्यामुळे त्याच्यावर तिचा राग होता. याच कारणास्तव तिने काही कामासाठी १५ दिवस गावी गेलेल्या बॉडीगार्डला कामावरून काढून टाकल्याची माहिती सूत्रांनी दिली.
मुंबई पोलिसांचे तपासात असहकार्य?मुंबई पोलीस हे पाटणा पोलिसांना सहकार्य करत नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. संशयित आरोपींमध्ये रिया चक्रवर्तीसह तिची आई संध्या तसेच अन्य महिलांचा समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या चौकशीसाठी पाटणा पोलिसांना महिला कॉन्स्टेबल किंवा अधिकाºयाची गरज आहे. मात्र मुंबई पोलिसांकडून त्यांना अद्यापही महिला पोलीस उपलब्ध करून दिले गेले नसल्याचे समजते. तसेच तपासासाठी त्यांना वाहनही पुरवण्यात न आल्याने रिक्षातून इच्छितस्थळी पोहोचावे लागत असल्याची माहिती हाती आली आहे. यातील तथ्य जाणून घेण्यासाठी पोलीस उपमहानिरीक्षक (पाटणा) संजय सिंग यांना विचारले असता मी याबाबत काही वक्तव्य करून शकत नसल्याचे उत्तर त्यांनी दिले.चौकशी होणार का?सिद्धार्थ पिठाणीची चौकशी होणार का? याबाबत पाटणा पोलिसांना विचारले असता, सध्या तरी त्याच्या चौकशीबाबत काहीच निश्चित न झाल्याचे उत्तर त्यांनी दिले. दरम्यान, यापूर्वी मुंबई पोलिसांनी त्याचा जबाब नोंदविला आहे. सुशांतचा मित्र महेश शेट्टी याला या प्रकरणात मुख्य साक्षीदार बनविले जाणार असल्याचे वृत्त आहे. त्या अनुषंगाने सध्या पाटणा पोलीस त्याची चौकशी करत आहेत.सीबीआयची मदत घेण्यास अडचण काय? - सोमय्याठाणे : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येचा तपास करणे महाराष्ट्र पोलिसांना जमत नसेल, तर सीबीआय किंवा बिहार पोलिसांना तो देण्यास अडचण काय आहे, असा प्रश्न भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी केला. याप्रकरणी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे सरकार सहकार्याची भूमिका घेत नसल्याचा आरोप त्यांनी केला.