शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज
2
आजचे राशीभविष्य, ७ नोव्हेंबर २०२४ : घरात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक प्रसन्नता जाणवेल
3
EVM हॅक करून तुम्हाला जिंकून देतो; ५ लाख न दिल्यास पराभव करेन, उद्धवसेनेच्या उमेदवाराकडे मागितली खंडणी
4
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
5
वरळीत वरचष्मा कोणाचा? आदित्य ठाकरे विरुद्ध देवरा आणि देशपांडेंच्या उमेदवारीमुळे रंगत
6
Ind Vs Aus: "ऑस्ट्रेलिया भारताला ३-१ ने नमवेल", रिकी पाँटिंगने केलं भाकित
7
महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी
8
बुरखा घालून मंगळसूत्र चोरणाऱ्या महिलेला बेड्या, लोहमार्ग पोलिसांकडून साथीदारालाही अटक
9
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
10
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
11
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
12
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
14
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
15
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
16
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
17
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
18
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
19
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर

स्फोटकांमागील सूत्रधार कोण? पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी; वाझे यांना २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 1:09 AM

या प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने वाझे यांना शनिवारी सकाळी ११ वाजता पेडर रोड येथील कार्यालयात बोलावले होते. सुमारे १३ तास चौकशी केल्यानंतर रात्री ११.५० वाजता त्यांना अटक करण्यात आली.

मुंबई :  उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (sachin Vaze) यांना विशेष न्यायालयाने २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. त्याचवेळी ही स्फोटके पेरण्यामागील मास्टरमाईंड शोधण्यासाठी एनआयएने मुंबई गुन्हे अन्वेषण शाखेच्या गुन्हे गुप्त वार्ता (सीआययू) विभागातील अधिकाऱ्यांची कसून चौकशी सुरू केली आहे. सचिन वाझे यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असलेले दोन अधिकारी व दोघा वाहनचालकांची साडेनऊ तास चौकशी करण्यात आली. आणखीही काही अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. (Who is the mastermind behind the explosives? Interrogation of police officers Waze remanded in NIA custody till March 25) या प्रकरणाच्या चौकशीसाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने वाझे यांना शनिवारी सकाळी ११ वाजता पेडर रोड येथील कार्यालयात बोलावले होते. सुमारे १३ तास चौकशी केल्यानंतर रात्री ११.५० वाजता त्यांना अटक करण्यात आली. रविवारी सकाळी त्यांची जे. जे. रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्या वेळी त्यांना सलाईन लावण्यात आली होती. त्यानंतर दुपारी अडीचच्या सुमारास त्यांना सत्र न्यायालयातील एनआयएच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले.  विशेष न्यायालयाने त्यांना ११ दिवस एनआयए कोठडी सुनावली. या कालावधीत पूर्ण कटाचा छडा आणि आवश्यक पुरावे जमविण्याचे आवाहन तपास अधिकाऱ्यांसमोर आहे. रविवारी दुपारी बारा वाजल्यापासून ‘सीआययू’चे सहायक निरीक्षक रियाजुद्दीन काझी, एक उपनिरीक्षक व दोन वाहनचालकांकडे चौकशी करण्यात येत आहे. वाझे यांच्या सांगण्यानुसार त्यांनी गुन्ह्याच्या कामात त्यांना सहकार्य केल्याचा अधिकाऱ्यांचा कयास आहे.त्यांच्यासह एका सहायक आयुक्त व अन्य काही पोलिसांनाही लवकरच चौकशीसाठी पाचारण केले जाणार असल्याचे समजते. त्यामध्ये  विक्रोळी पोलीस ठाण्यातील पोलीसदेखील चौकशीच्या फेऱ्यात अडकण्याची शक्यता आहे. १८ फेब्रुवारीला त्यांनी कोणत्या कागदपत्रांच्या आधारे आणि कोणत्या पोलीस अधिकाऱ्याच्या इशाऱ्यावरून स्कॉर्पिओ चोरीचा गुन्हा दाखल केला, याची चौकशी केली जाणार आहे.रियाझ काझी हे गेल्या ३ वर्षांपासून सीआययूमध्ये कार्यरत आहेत. सीआययू विभागात सचिन वाझे हे कार्यरत आहेत. जानेवारी महिन्यात टीआरपी घोटाळ्याप्रकरणी केलेल्या कामगिरीबद्दल बेस्ट डिटेक्शन म्हणून मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सहायक पोलीस आयुक्त शशिकांत सांडभोर, सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे, नितीन लोंढे, संतोष कोटवान आणि रियाझ काझी यांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित केले होते.

सचिन वाझेंवरील दाखल कलमे -कलम २८६ : जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने स्फोटके बाळगणे, इतरांच्या जिवाला धोका होईल असे वर्तन करणेकलम ४६५ : खोट्या किंवा बनावट गोष्टी करणेकलम ४७३ : दिशाभूल करण्यासाठी केल्या जाणाऱ्या बनावट कृतीकलम ५०६(२) : दहशत निर्माण करणे किंवा धमकी देणेकलम १२० ब  : गुन्हेगारी स्वरूपाच्या षड्‌यंत्रात सहभाग घेणेस्फोटक पदार्थ कायदा १९०८ कलम ४ अ, ब – स्फोटके बाळगण्याचायात समावेश आहे.

निलंबन अटळ : कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याला ४८ तासांहून अधिक काळ पोलीस कोठडी मिळाल्यास त्याचे निलंबन केले जाते. त्यामुळे सचिन वाझे यांच्यावरील निलंबनाची कारवाई अटळ असून येत्या दोन दिवसांत आयुक्तांकडून त्याबाबतचे आदेश जारी केले जातील, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

‘ती’ इनोव्हा क्राईम ब्रँचचीच : अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ जिलेटिनच्या कांड्या असलेल्या स्कॉर्पिओच्या पाठीमागे पांढऱ्या रंगाची इनोव्हा सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत होती. ही गाडी क्राईम ब्रँचच्याच वाझे कार्यरत असलेल्या गुन्हे गुप्त वार्ता (सीआययू)ची असल्याचे स्पष्ट झाले आहे. एनआयएच्या अधिकाऱ्यांनी रविवारी ती गाडी जप्त केली.

मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणातही वाझेंचा सहभाग?- २४ फेब्रुवारीला पेडर रोड येथे जिलेटिनच्या कांड्या गाडीत ठेवण्यापासून ते त्याचा तपास करीत असल्याचा बनाव करेपर्यंत आणि स्कॉर्पिओचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूपर्यंतच्या घटनेत वाझे यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. - वाझे यांनी या कृत्याची कबुली दिल्याचा दावा यावेळी सरकारी वकिलांकडून करण्यात आला, तर बचाव पक्षाच्या वकिलांनी सर्व आरोप फेटाळून लावले.

प्रकरण स्थानिक - पवार : सचिन वाझेंच्या अटकेसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारले असता, प्रकरण स्थानिक असल्याचे सांगत त्यांनी यावर अधिक भाष्य करणे टाळले. 

राज्य सरकारने सचिन वाझे यांना सातत्याने वाचविण्याचा प्रयत्न केला. सरकारने त्यांची एकप्रकारे वकिली केली. हे प्रकरण अतिशय गंभीर असून ‘एनआयए’ला तपासादरम्यान अनेक पुरावे मिळाले असून आणखी बरीच माहिती समोर येईलच.     - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते 

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेPoliceपोलिसMukeshमुकेशNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाMansukh Hirenमनसुख हिरण