श्रीनगर - दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यातून हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या दहशतवाद्यास सुरक्षा दलाने अटक केली आहे. इम्रान नबी डार असे या दहशतवाद्याचे नाव असून तो कुलगाममधील लालवाणी भागात राहणारा आहे. पोलिसांनी त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला असून त्याच्याकडून चौकशी केली जात आहे.वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा दहशतवादी जंगलात मंडी रुग्णालयात आला असल्याची गुप्त माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली होता. मिळालेल्या माहितीच्या आधारे लष्कराच्या आरआर, सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या एसओजी यांच्या संयुक्त पथकाने तातडीने अनंतनागमधील जंगलात मंडी येथील रुग्णालयाला घेराव घातला आणि सामान्य लोकांच्या सुरक्षेचा विचार करता दहशतवादी इम्रानला अटक केली. त्याच्या ताब्यातून एक पिस्तूल आणि काही अन्य आक्षेपार्ह साहित्यही जप्त केले आहे.पोलिसांनी सांगितले की, इम्रानचा कुलगाममधील लालवाणी येथे राहणार मुलगा गुलाम नबी हा १० जूनपासून बेपत्ता होता. पोलिस त्याचा शोध घेत होते. काही दिवसांपूर्वी तो हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामील झाल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी त्याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुलामकडून हिजबुलशी संबंधित अनेक महत्वाची माहिती मिळू शकते असा दावा पोलिसांनी केला आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
पतीच अब्रूशी खेळला! पत्नीला फसवून निर्जनस्थळी नेले अन् घडवून आणली लज्जास्पद घटना
Unlock1 : पत्नीने वेळ साधली! पती क्वारंटाईन होताच प्रियकरासोबत 'छू मंतर' झाली
रक्षक बनले भक्षक! गुंगीचे औषध देऊन पोलिसाने केला अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार
बँकेला चुना लावणाऱ्यांविरोधात CBIनं दाखल केला गुन्हा; मुंबईतील २ खासगी कंपन्यांचाही समावेश
भाजपा नेत्या, TIKTOK स्टार सोनाली फोगाट यांना अटक