आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अंतरिम जामीन का दिला?; सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टच सांगितलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 11:29 AM2020-11-27T11:29:42+5:302020-11-27T11:30:49+5:30

Arnab Goswami News : महाराष्ट्रात अर्णब गोस्वामींना अटक होताच राजकीय वातावरण तापले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयावर टीकाही करण्यात आली होती.

Why granted interim bail to Arnab Goswami in suicide case?; Supreme Court told reason | आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अंतरिम जामीन का दिला?; सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टच सांगितलं!

आत्महत्या प्रकरणात अर्णब गोस्वामींना अंतरिम जामीन का दिला?; सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टच सांगितलं!

Next

नवी दिल्ली : अलिबागचे इंटेरिअर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामींना अटक केली होती. तसेच त्यांच्यावर आत्महत्येला प्रवृत्त केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला होता. यावर उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळत खालच्या न्यायालयात जाण्यासाठी सांगितले होते. याविरोधात गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. यावर न्यायालयाने गोस्वामींना अंतरिम जामीन दिला होता. याचे कारण आज न्यायालयाने दिले आहे. 


महाराष्ट्रात अर्णब गोस्वामींना अटक होताच राजकीय वातावरण तापले होते. ११ नोव्हेंबरला सर्वोच्च न्यायालायाने गोस्वामींना जामीन दिला होता, तसेच उच्च न्यायालयालाही फटकारले होते.  वैयक्तिक स्वातंत्र्य नाकारले जाण्याच्या प्रकरणांत उच्च न्यायालयांची कामगिरी समाधानकारक नाही, असे ताशेरेही सर्वोच्च न्यायालयाने ओढले आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. इंदिरा बॅनर्जी यांच्या सुटीकालीन खंडपीठापुढे अर्णब गोस्वामी व अन्य आरोपींच्या जामीन याचिकेची सुनावणी झाली. त्यावेळी अर्णब गोस्वामी, नितीश सारडा, परवीन राजेश सिंह या तिघांनाही प्रत्येकी ५० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता.


 सुनावणीप्रसंगी न्या. धनंजय चंद्रचूड म्हणाले की, जर या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने वेळीच हस्तक्षेप केला नसता तर वैयक्तिक स्वातंत्र्य नष्ट करण्याच्या दिशेनेच एकूण वाटचाल सुरू राहिली असती. एखाद्याची वृत्तवाहिनी तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही ती पाहू नका. राज्य सरकार एखाद्या व्यक्तीला अशा प्रकारे लक्ष्य करत असेल तर त्या सरकारला रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालय आहे हे लक्षात घ्या अशीही तंबी सर्वोच्च न्यायालयाने दिली होती.


आज अंतरिम जामिन का दिला, याचे कारण सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे. महाराष्ट्र पोलिसांनी अर्णब गोस्वामींवर दाखल केलेल्या एफआयआरच्या प्रथम दर्शनी मूल्यमापनात गोस्वामींविरोधात गुन्हा केल्याचे दिसत नाही. यामुळे अंतरिम जामिन दिल्याचे कारण न्यायालयाने दिले आहे. 


अर्णब यांची सुटका आणि घोषणाबाजी
रात्री ८.१५ वाजता अर्णब तळोजा कारागृहातून बाहेर पडले. या वेळी गोस्वामी हे बाहेर पडताच गाडीतूनच ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा देऊ लागले. त्यांच्या समर्थकांनी कारागृह परिसरात मोठी गर्दी केली होती. ‘अर्णब जिंदाबाद’, ‘भारतमाता की जय’ यांसारख्या घोषणा सुरू केल्या होत्या. विशेष म्हणजे कारागृह परिसरात वाढती गर्दी लक्षात घेता पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. अर्णबच्या समर्थनार्थ कारागृहासमोरील रस्त्यावर समर्थकांनी ‘हॅपी दिवाली अर्णब’ - ‘सत्यमेव जयते’ अशा आशयाच्या रांगोळ्या काढल्या होत्या. कारागृहातून बाहेर पडणाऱ्या अर्णबचे स्वागत मोबाइल टॉर्च लावून सर्वांनी केले.
 

Web Title: Why granted interim bail to Arnab Goswami in suicide case?; Supreme Court told reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.