भाजपाचे राज्यसभेचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी शुक्रवारी एक ट्वीट करून मुंबईपोलिसांनी अद्याप बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या चौकशीत एफआयआर का नोंदविला नाही असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच शवविच्छेदन अहवाल प्रोविजनल का आहे हे देखील त्यांनी स्पष्ट केले.
स्वामींनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्वीट करून 'मुंबईपोलिसांनी सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एफआयआर का दाखल केला नाही? पोस्टमार्टम रिपोर्ट प्रोविजनल का म्हटले गेले? दोन्ही प्रश्नाचे एकच कारण आहे. रुग्णालयाच्या डॉक्टरांना फॉरेन्सिक विभागाकडून सुशांतच्या व्हिसेरा अहवालाची प्रतीक्षा आहे, जेणेकरुन सुशांतला विषबाधा झाली की नाही हे समजू शकेल. सुब्रमण्यम यांनी मुंबई पोलिसांनावर टीका करत मुंबई पोलिसांकडे ८० टक्के गुन्हांचा तपास सीबीआयकडे सोपवला जातो असे म्हटलं आहे.
याआधी स्वामींनी ट्विटरवर सुशांत सिंग राजपूतची 'हत्या' झाली आहे असे त्यांना वाटत आहे, असे लिहिले होते. स्वामींनी आपल्या दाव्याच्या समर्थनार्थ कागदपत्रे पोस्ट केली होती. स्वामींनी एका दस्तऐवजाचे फोटो ट्विट केले होते. ज्यात 26 पॉइंट्स होते. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले होते, 'मला यामुळे वाटते की, सुशांत सिंग राजपूतची हत्या झाली आहे.' कागदपत्रांनुसार, सुशांतच्या गळ्यावरील खुणा आत्महत्येचे नव्हे तर हत्येच्या खुणा असल्याचे दिसत आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना २ वर्ष तडीपारीची नोटीस; ५ जिल्ह्यातून हद्दपार होण्याचे आदेश
गोरखपूर दहशतवाद्यांच्या टार्गेटवर; राम मंदिर भूमीपूजनाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट जारी
मेट्रो रेल्वे प्रशासनात खळबळ, महा मेट्रोची टेलिफोन लाईन हॅक देश-विदेशात केले गेले कॉल
तरुणी प्रेमात सैराट; प्रियकरासोबत पळून जाण्याआधी स्वत:च्याच घरातून १३ लाखांची चोरी केली अन्...
रियाच्या याचिकेवर निर्णय देण्यापूर्वी आमचं ऐकावं, सुशांतच्या कुटुंबीयांचे सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल
वेश्याव्यवसाय प्रकरणी कोलव्यात मध्यप्रदेशातील एकजण जेरबंद