- मधुकर ठाकूर उरण : जेएनपीटी बंदरातून चोरट्या मार्गाने अमली पदार्थ आयात-निर्यात करण्यात येणारे तस्करीचे या आधीही अनेक प्रकार उघडकीस आले आहेत. सागरी मार्ग अमलीपदार्थांच्या तस्करीच्या दृष्टीने सुरक्षित मानला जात आहे. त्यामुळे गेल्या दोन वर्षात तब्बल १,0२५ प्रकरणे दाखल होऊनही ही तस्करी अद्याप सुरूच आहे.शनिवारी जेएनपीटी बंदरात कंटेनर कार्गोमधून कॉस्मेटिक आणि आयुर्वेदिक मेडिसिन ‘मुळेठी’च्या नावाखाली अफगाणिस्तान येथून आणि चाबाराह बंदरातून चोरट्या मार्गाने जेएनपीटी बंदरात हेरॉइनचा साठा आणण्यात येत असल्याची माहिती, मुंबई डीआरआय आणि नार्कोटिक कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. जेएनपीटी बंदरात हेरॉइनचा हा साठा जप्त करण्यात आल्याने गेल्या दोन वर्षांत मोठ्या प्रमाणावर कारवाई होऊनही या तस्करी सुरू असल्याने ड्रगमाफियांच्या मोडस आॅपरेंडीवर शिक्कामोर्तब झाले आहे. अर्धा इंचाच्या प्लास्टीकचे पाइप छोटे-छोटे तुकडे करून त्याला बांबूचा हिरवा मुलामा देण्यात आला होता.केवळ खबऱ्यांकडून खात्रीलायक माहिती मिळाल्यानेच जेएनपीटी बंदरातून कार्गो कंटेनरमधून लपवून आणलेला हा साठा जप्त करणे शक्य झाल्याची माहिती डीआरआय अधिकाºयांनी दिली. अमली पदार्थांचा एवढा मोठा साठा पकडण्याची या वर्षातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येत आहे.आंतरराष्ट्रीय माफिया टोळीचा सहभागमागील महिन्यात दिल्लीच्या स्पेशल पोलीस विभागाच्या अधिकाºयांनी १३० किलो वजनाचा हेरॉइनचा साठा जप्त केला होता. त्यात सापडलेल्या आरोपींच्या तपासातून अफगाणिस्तानमधून अमली पदार्थांची तस्करी करणाºया आंतरराष्ट्रीय माफियांच्या टोळीची माहिती तपास अधिकाºयांच्या हाती लागली होती.यातूनच अफगाणिस्तान माफियांमार्फत १,००० कोटींच्या हेरॉइन तस्करीच्या कनेक्शनचे धागेदोरे हाती लागले. त्यानंतरच कारवाई करण्यात आली. या तस्करीच्या मुळापर्यंत जाण्यासाठी या प्रकरणी आणखी काही तस्करांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येणार आहे. मात्र, तपासकामात अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. यामुळे तपास पूर्ण झाल्याखेरीज अधिक माहिती देण्यास डीआरआय अधिकाºयांनी नकार दिला.हशीश, कोकेन आणि एमडीही...मुंबई डीआरआय आणि नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने केलेल्या संयुक्तिक कारवाईत २०१८ पासून २०१९ पर्यंत मागील दोन वर्षांत हेरॉइन, हशीश, कोकेन, कन्नाबीस, एमडी, एलएसडी आणि अन्य अमली पदार्थ तस्करीप्रकरणी १,०२५ गुन्हे दाखल झाले आहेत. यात २०१८ मध्ये व २०१९ मध्ये ७३४ प्रकरणांचा समावेश आहे. २०१८ व २०१९मधील दाखल करण्यात आलेल्या एकूण १,०२५ केसेसमध्ये १,२५६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात जानेवारी, २०२० पासून आॅगस्ट महिन्यातील कारवाईचा समावेश नाही.
हेरॉईन तस्करीसाठी सागरी मार्गाचा सर्रास वापर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 9:28 AM