पत्नीने आत्महत्या केली, नवऱ्याच्या फोटोवर लिहिले; 'मैं बेवफा नहीं हूं... मेरा मंगल मेरी जान ले गया'
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 03:27 PM2022-07-25T15:27:33+5:302022-07-25T16:46:32+5:30
Suicide Case : मृताच्या हातावर कथित सुसाईड नोटही लिहिली आहे. ज्यामध्ये ती स्वइच्छेने जीव देत असल्याचे लिहिले आहे.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एका महिला शिक्षिकेचा मृतदेह तिच्या सासरच्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. सुनेने आत्महत्या केल्याचे सासरच्यांनी पोलिसांना सांगितले, तर मृत महिलेच्या कुटुंबियांनी हत्येचा आरोप केला आहे. मृताच्या हातावर कथित सुसाईड नोटही लिहिली आहे. ज्यामध्ये ती स्वइच्छेने जीव देत असल्याचे लिहिले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रायसेन येथील रहिवासी असलेल्या इंदूचा विवाह भोपाळ येथील रहिवासी सुभाष साहू यांच्याशी ३ वर्षांपूर्वी झाला होता. इंदू सरकारी शाळेत शिक्षिका (गेस्ट टीचर) होत्या. गुरुवारी सकाळी इंदूचे पती सुभाष यांनी पत्नीने गळफास घेतल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचेपर्यंत मृतदेह खाली उतरवला होता. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून मृताच्या नातेवाईकांना माहिती देण्यात आली.
पोलिसांना मृतदेहाजवळ पतीचा फोटो सापडला, ज्याच्या मागे 'मी बेवफा नाही' असे लिहिले होते. याशिवाय मृताच्या तळहातावर असेही लिहिले होते की, 'मी माझ्या स्वेच्छेने माझा जीव देत आहे. आई, बाबा, भावा माफ कर. माझ्या मंगळाने माझा जीव घेतला'. पोलिसांनाही हे दोन्ही हस्तलेखन जुळून पाहत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या पतीने सांगितले की, पत्नीने गळफास लावून घेतला आहे, तर मृताच्या नातेवाईकांनी सासरच्या मंडळींवर मुलीची हत्या केल्याचा आरोप केला आहे. जावई आपल्या मुलीचा छळ करत असे व संशय घेत असे, त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला, असा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. पण अपघाताच्या काही तास आधी जेव्हा मुलगी फोनवर बोलली तेव्हा तिने सगळं नॉर्मल असल्याचं सांगितलं. मात्र काही तासांनंतर त्यांच्या मृत्यूची बातमी आली.