रात्री संबंध बनवताना पत्नी भडकली; ब्लेडनं केला पतीच्या प्रायव्हेट पार्टवर हल्ला, मग..
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 03:09 PM2021-12-13T15:09:34+5:302021-12-13T15:10:15+5:30
पत्नीने केलेल्या हल्ल्यामुळे पतीच्या प्रायव्हेट पार्टला मोठी दुखापत झाली आहे. या घटनेनंतर पतीने जतारा पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात तक्रार नोंदवत त्याच्यावर घडलेल्या प्रसंगाचा खुलासा केला आहे.
टिकमगड – पती-पत्नी यांच्यातील वाद काही नवीन नाहीत. घरापासून अगदी कोर्टापर्यंत हे वाद ऐकायला मिळतात. पतीने पत्नीला मारहाण करणं, पत्नीने पतीविरोधात छळाचे आरोप करणं या घटना देशात दरदिवशी घडत असतात. परंतु मध्य प्रदेशातील टिकमगड जिल्ह्यात घडलेल्या एका घटनेने सगळेच हैराण झाले आहेत. याठिकाणी पती-पत्नी यांच्यातील भांडणामुळे पतीला थेट उपचारासाठी हॉस्पिटल गाठावं लागलं आहे.
सध्या पतीची अवस्था गंभीर असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. पत्नीने केलेले कृत्य ऐकून तुम्हीही हैराण व्हाल. शारिरीक संबंध बनवताना पती-पत्नीमध्ये जोरदार भांडण झालं. त्यात रागाच्या भरात पत्नीने पतीच्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने हल्ला केला. या हल्ल्यात पतीची अवस्था बिकट झाली त्याच्यावर सध्या झांशी येथील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काही वर्षापूर्वी या दोघांचे लग्न झाले होते.
पत्नीने केलेल्या हल्ल्यामुळे पतीच्या प्रायव्हेट पार्टला मोठी दुखापत झाली आहे. या घटनेनंतर पतीने जतारा पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात तक्रार नोंदवत त्याच्यावर घडलेल्या प्रसंगाचा खुलासा केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनीही पीडित पतीची मदत केली आहे. माझ्या लग्नाला ३ वर्षही पूर्ण झाले नाहीत. रात्री संबंध बनवताना पत्नीने माझ्या प्रायव्हेट पार्टवर ब्लेडने हल्ला केला. त्यामुळे त्यातून रक्त वाहू लागलं. या घटनेनंतर नातेवाईकांनी पतीला जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र अधिक उपचारांची गरज असल्याने त्याला झांशी येथील हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
विशेष म्हणजे, घटनेनंतर पतीने रविवारी संध्याकाळी पोलीस ठाण्यात निवेदन दिले. पत्नी अजूनही सासरीच राहत आहे. जतरा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. अद्याप कुठलीही FIR दाखल करण्यात आली नाही. तर जखमी पतीवर उपचार करणारे डॉक्टर हे प्रकरण गंभीर असल्याचं म्हटलं आहे. पत्नीने असं कृत्य का केले हे मला माहिती नाही. २०१९ मध्ये आमचं लग्न झालं होतं. पूर्वी आमच्यात भांडणं व्हायची परंतु आता सर्वकाही ठीक होते असा दावा पीडित पतीने केला आहे.