शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

भयंकर! नवऱ्याने चॉकलेट आणलं नाही म्हणून नाराज झालेल्या बायकोने उचललं टोकाचं पाऊल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 09, 2023 5:44 PM

नवऱ्याने चॉकलेट आणलं नाही म्हणून नाराज झालेल्या बायकोने टोकाचं पाऊल उचललं.

बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवऱ्याने चॉकलेट आणलं नाही म्हणून नाराज झालेल्या बायकोने टोकाचं पाऊल उचललं. आत्महत्या करून आपलं जीवन संपवलं आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सहकारनगर येथील सलूनमध्ये काम करणाऱ्या गौतमची पत्नी नंदिनी हिने आत्महत्या केली आहे. आपल्या सुसाईड नोटमध्ये कोणावरही आरोप केलेला नाही. 

गौतम आणि नंदिनी दोघेही एकमेकांना कॉलेजपासून ओळखत होते, त्यानंतर त्यांनी लग्न केलं. त्यांना दोन मुले आहेत. घटनेच्या दिवशी गौतम कामावर जात असताना नंदिनीने त्याला अडवले. दोघांमध्ये वाद झाला आणि नंदिनीने गौतमला चॉकलेट विकत घेण्यास सांगितले. गौतम चॉकलेट घेऊन परत येईन असे सांगून निघून गेला, पण नंदिनीच्या कॉलला उत्तर दित नाही.

रात्री 11.45 च्या सुमारास नंदिनीने त्याला व्हॉट्सएपवर मेसेज केला की, ती जात आहे. तिने गौतमला लवकर घरी येण्यास सांगितले आणि मुलांना खाऊ घालण्यास सांगितले, त्यांची चांगली काळजी घेण्यास सांगितलं, घाबरून गौतमने तिला कॉल केला पण तिने कॉल उचलला नाही. 

घरी पोहोचल्यावर गौतमला पत्नी नंदिनी गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. गौतमने सकाळी घडलेला प्रकार सांगितला. नंदिनीच्या कुटुंबीयांनीही गौतमवर कोणतेही आरोप केलेले नाहीत. याप्रकरणी हेन्नूर पोलिसांनी मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी