पोलिस सर्वसाधारणपणे जनतेचे रक्षक मानले जातात. कोणताही वाद, चोरी किंवा कोणत्याही प्रकारचा गुन्हा असला तरी लोक न्यायासाठी पोलिसांकडे जातात. परंतु संरक्षक करणारा पोलीस भक्षक झाला तर काय? बिहारमधील गया येथून एक अतिशय भयावह प्रकरण समोर आले आहे. नुकताच गयामध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आश्चर्य म्हणजे मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) वर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी गयाचे तत्कालीन डीएसपी मुख्यालय कमलाकांत प्रसाद यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार पीडितेचा आरोप आहे की २०१७ मध्ये दसऱ्याच्या वेळी तिच्यावर इमामगंज पोलिस स्टेशन परिसरातील तत्कालीन डीएसपीने बलात्कार केला होता. याप्रकरणी डीएसपीविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पॉक्सो कोर्टाचे विशेष न्यायाधीश नीरज कुमार यांच्या सूचनेवरून मंगळवारी पीडित मुलीचा जबाब नोंदविण्यात आला. ज्यामध्ये पीडित मुलीने तिच्यावर झालेल्या बलात्काराबद्दल सांगत तत्कालीन डीएसपी कमलाकांत प्रसाद यांच्यावरील आरोपाची माहिती दिली आहे.या प्रकरणाच्या तपासामध्ये सीआयडीचा सहभाग
या प्रकरणाची माहिती उघड झाल्यानंतर सीआयडीने या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या संदर्भात माहिती देताना जिल्हा एसएसपी आदित्य कुमार म्हणाले की, पोलीस मुख्यालय व सीआयडीच्या आदेशानुसार माजी डीएसपी कमलाकांत प्रसाद यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीआयडी पीडितेच्या जबाबाच्या आधारे कारवाई करत आहे. एफआयआरनुसार मुलीची तत्कालीन डीएसपी कमलाकांत यांच्या निवासस्थानी वास्तव्य असताना ही घटना घडली. विशेष म्हणजे डीएसपीच्या या दुष्कृत्यावरून इतर कोणीही नाही, तर त्याची पत्नी तनुजाने आवाज उठविला आहे आणि घटना उघडकीस आणली आहे.