मध्यप्रदेशच्या हरदा जिल्ह्यातील सिव्हिल लाइन भागात राहणाऱ्या एका पीडित महिलेने पतीविरोधात तक्रार दाखल केली. पतीवर आरोप आहे की, तो शारीरिक रूपाने कमजोर आहे. त्याला पत्नीने उपचार घेण्याचा सल्ला दिला. पण तो काहीच करत नाही. हे जेव्हा महिलेने सासूला सांगितलं तर पतीने तिला मारहाण केली.
पीडितेने सांगितलं की, लग्न झाल्यापासूनच पती आणि तिच्यात अंतर राहिलं. त्यानंतर ती अनेकदा याबाबत पतीसोबत बोलली. ती त्याला म्हणाली की, जर तुम्हाला काही शारीरिक कमजोरी असेल तर त्यावर उपचार करा. पण पती उपचार घेत नाही. लग्नाच्या दोन वर्षानंतरही त्यांना अपत्य नाही.पीडितेने आरोप केला की, याच कारणावरून दोघांमध्ये भांडण होतं. पण सासू आणि पती तिलाच मारहाण करू लागले. आता महिलेने याबाबत पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
महिला म्हणाली की, 'माझा पती मला खूप मारहाण करतो. त्याला म्हणाले की, उपचार कर. तर तेही करत नाही. मी पतीच्या आईला सांगितलं की, मुलाला काही उपचार घेण्यास सांगा. हे सासूने पतीला जाऊन सांगितलं तर त्याने मला मारहाण केली. पोलिसांनी तक्रार तर नोंदवून घेतली, पण काही कारवाई केली नाही'.
पीडितेच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांच्या जावयाचं याआधीही एक लग्न झालं होतं आणि नंतर त्यांचा घटस्फोट झाला होता. त्यानंतर मी माझ्या मुलीचं लग्न त्याच्यासोबत लावून दिलं. जावई मुलीला मारहाण करतो. मुलीने जावयाला उपचार घेण्याचा सल्ला दिला. पण तो काही ऐकत नाही. पुन्हा पुन्हा तो मारहाण करत असल्याने मुलगी आणि आम्ही पोलिसात तक्रार दाखल केली आहे.