Divorce : उत्तर प्रदेशच्या अलिगढमधून पती-पत्नीच्या वादाचं एक अजब कारण समोर आलं आहे. इथे पतीच्या वागण्याला कंटाळून एका पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. पत्नी म्हणाली की, पती खर्चासाठी पैसे देत नाही आणि ना मेकअपचं साहित्य घेण्यासाठी पैसे देत नाही. पती म्हणतो की, माझा चेहरा चांगला नाही. मी त्याच्यासोबत राहण्याच्या लायक नाही.
महिलेने फॅमिली कोर्टात पतीपासून घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. फॅमिली कोर्टात तैनात काउन्सेलर योगेशने सांगितलं की, अर्जात लिहिलं आहे की, ती तिच्या पतीकडे मेकअपच्या वस्तू घेण्यासाठी आणि आपल्या खर्चासाठी पैसे मागते.
पण तिचा पती तिला काहीच पैसे देत नाही. त्यासोबतच महिलेचा आरोप आहे की, पती तिला म्हणाला की, तिचा चेहरा चांगला नाही. त्यामुळे तो तिला त्याच्यासोबत ठेवू शकत नाही. तसेच महिलेने तिच्या सासू-सासऱ्यांवरही गंभीर आरोप लावले आहेत.
अर्जात लिहिलं आहे की, तिचं लग्न दिल्लीत राहणाऱ्या तरूणासोबत 2015 मध्ये झालं होतं. तो खाजगी कंपनीत काम करतो. लग्नानंतर सगळं काही ठी सुरू होतं. पण काही महिन्यांनी पतीचं माझ्यासोबतचं वागणं बदललं.
महिला पुढे म्हणाली की, जेव्हा मी पतीकडे मेकअपच्या वस्तूंसाठी पैसे मागते, तेव्हा तो नकार देतो. घरखर्चासाठीही पैसे देत नाही. सासू-सासरेही पतीला साथ देतात. पती म्हणतो की, मी त्याच्या घराच्या लायक नाही आणि ना त्याच्यासाठी. त्यामुळे मला त्याच्यासोबत रहायचं नाही.
महिलेने सांगितलं की, एक दिवस सासू-सासऱ्यांनी आणि पतीने मिळून तिला रात्री 11.30 वाजता घरातून काढून दिलं होतं. मी सासू-सासऱ्यांना म्हणाले की, मी तुमच्या मुलीसारखी आहे. पण त्यांनी माझं काहीच ऐकलं नाही. हे जेव्हा मी माझ्या आई-वडिलांना सांगितलं तर ते म्हणाले की, ही छोटी बाब आहे. सगळ्याच घरांमध्ये हे होत असतं. त्यांनीही मला काही मदत केली नाही.
महिलेने सांगितलं की, तिच्या लग्नाला 7 वर्षे झाली आहेत. पण ती आई बनू शकली नाही. यासाठी ती डॉक्टरकडेही गेली होती. ऑपेशनही केलं होतं. या उपचाराचा खर्च तिच्या बहिणीने दिला. पतीकडे पैसे मागितले तर त्याने दिले नाही.