उत्तर प्रदेशमध्ये एका प्रसिद्ध विद्यापीठाच्या प्राध्यापकासोबत विचित्र किस्सा घडला आहे. पत्नीच्या वागण्याने हा प्रोफेसर त्रस्त झाला होता. आसामच्या प्रतिभा तिवारी नावाच्या एका महिलेसोबत त्याचे २०११ ला लग्न झाले होते. परंतू लग्न झाल्यापासून काही ना काही कारणावरून त्यांच्यात वाद होत रहायचे. लग्नाच्या १३ वर्षांनी या प्राध्यपकाच्या हातात असे काही पुरावे लागले की त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. ते पोलिसांत गेले तरी पोलीस कौटुंबीक वाद म्हणून टाळू लागली आहे.
अलाहाबाद विद्यापीठाचे सहाय्यक प्राध्यापक अमरेंद्र त्रिपाठी यांनी पत्नीविरोधात प्रयागराजमधील पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटले की, मे महिन्यात बेडरुममध्ये असे काही कागदपत्र मिळाले की त्यातून माझ्या पत्नीने लग्नापूर्वी म्हणजेच २००७ मध्ये धर्म परिवर्तन केले होते. तिने इस्लाम धर्म स्वीकारला होता. तसेच एका मुस्लिम तरुणाशी लग्न केले होते. या विषयावर त्रिपाठी यांनी पत्नीसोबत चर्चा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तिने त्यांना घराबाहेर हाकलून दिले.
त्रिपाठी यांचे लग्न 27 जून 2011 मध्ये आसामच्या महिलेशी झाले होते. त्यांना आता दोन मुले आहेत. त्रिपाठी यांच्या तक्रारीनुसार लग्नानंतर काही काळातच पत्नीचे वागणे आक्रमक आणि अमानवीय होऊ लागले होते. परंतू रीतीरिवाज म्हणून नाते सांभाळून ठेवले. १३ मे २०२४ ला बेडरुममध्ये मला काही कागद मिळाले त्यात तिचे आधीच लग्न झाले होते व तिने धर्म परिवर्तनही केले होते असे समजले. तिने दिल्लीच्या मुस्लिम मुलासोबत लग्न केले होते. हे सर्व माहिती असूनही तिच्या घरवाल्यांनी तिचे लग्न माझ्याशी करून दिले, हा माझ्याबरोबर झालेला छळ असल्याचा आरोप त्रिपाठी यांनी केला आहे.
पत्नीने अनेकदा माझे फोटो, व्हिडीओ व्हायरल करून त्रास देण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात केवळ कौटुंबिक वाद असल्याचे गृहीत धरले असून कोणतीही कारवाई केलेली नाहीय.