आधी प्रेम, मग अत्याचार! पतीच्या मदतीने महिलेने केली बॉयफ्रेन्डची हत्या....
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2021 12:36 PM2021-05-12T12:36:59+5:302021-05-12T12:44:05+5:30
निवाडी जिल्ह्यातील पृथ्वीपूरच्या सिमारा खिरखमध्ये सोमवारी एका २२ वर्षीय तरूणाची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी केवळ २४ तासात केस सॉल्व करत आरोपींना गजाआड टाकलं.
मध्य प्रदेशच्या निवाडीमध्ये एका हत्येचा केसचा खुलासा करत पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, ही हत्या अनैतिक संबंधाच्या प्रकरणातून झाली होती. निवाडी जिल्ह्यातील पृथ्वीपूरच्या सिमारा खिरखमध्ये सोमवारी एका २२ वर्षीय तरूणाची हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी केवळ २४ तासात केस सॉल्व करत आरोपींना गजाआड टाकलं.
या घटनेचा खुलासा करत पोलीस अधिक्षक आलोक कुमार सिंह यांनी सांगितले की, अनैतिक संबंधातून हे कृत्य करण्यात आलं आहे. मृत संतोष कुशवाहाचे गावातील एका तरूणीसोबत अनैतिक संबंध होते. जशी महिलेच्या पतीला याची माहिती मिळाली तर त्याने हे प्रकरण बंद करण्यासाठी त्याने पत्नीला तयार केलं. पण खूपदा समजावल्यानंतरही मृत तरूण हे नातं संपवण्यासाठी तयार नव्हता. तो जबरदस्ती तिच्या घरी जात राहिला. नंतर आरोपी मोतीरामने पत्नी आणि त्याच्या मित्रासोबत मिळून संतोषच्या हत्येचा प्लॅन केला. (हे पण वाचा : धक्कादायक! महिलेने दिराच्या मदतीने पतीची केली हत्या, दगडाचे ठेचून घेतला त्याचा जीव...)
रविवारी रात्री आरोपीने पत्नीला संतोषला फोन करायला सांगितलं आणि शेतात भेटायला बोलवलं. जिथे महिलेचा पती आणि त्याचा मित्र संतोष कुशवाहची वाट बघत बसले होते. आधी या दोघांनी संतोषला शेतात दारू पाजली. जेव्हा संतोषला नशा चढली तर त्याच्याकडी फोन घेतला आणि त्याला मारहाण सुरू केली. नंतर गळा दाबून त्याची हत्या केली. त्यानंतर दोघेही तिथून फरार झाले. (हे पण वाचा : मालवाहू ऑटोच्या भाड्यावरून चालकाचा खून; चौघांनी केली मारहाण)
मृतकाच्या कुटुंबियांना याची माहिती देण्यात आली. आणि पोलिसांनी तपास सुरू केला. एका व्यक्तीकडून पोलिसांना खबर मिळाली की, संतोषचं सरोज कुशवाहाच्या घरी येणं-जाणं होतं. आणि त्याच्या पत्नीसोबत संतोषचे अनैतिक संबंध होते. पोलिसांनी याचा आधारावर आपला तपास पुढे नेला आणि आरोपींची ओळख पटवली.
पोलिसांनी तिन्ही आरोपींची चौकशी केली आणि नंतर सर्वांनी आपला गुन्हा कबूल केला. अनैतिक संबंधातून ही हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी तिघांनाही अटक केली असून पुढील कारवाई सुरू आहे.