शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

भाच्यासोबतचे अनैतिक संबंध पतीला समजले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून व्हॅलेंटाईन डे ला पतीची केली हत्या....

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 10:33 AM

Death Gift on Valentine Day husband Murdered by Wife : भाच्यासोबतचे अनैतिक संबंध (Extra Marital Affair) पतीला समजले होते. त्यावरून दोघांमध्ये भांडणं होत होती. अशात पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केेली.

Wife Murder Husband : राजस्थानच्या(Rajasthan) अलवरमध्ये(Alwar) पोलिसांनी एका हत्येच्या प्रकरणाचा खुलासा केला असून एका महिलेला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी महिलेने तिच्या ओढणीने पतीची गळा आवळून हत्या(Murder) केली आणि यावेळी तिचा प्रियकर पतीला पकडून होता.

पोलिसांनी सांगितले की, मृत व्यक्तीचं नाव कमल सिंह असून तो यूपीतील मथुरा येथील राहणार आहे. कमलची हत्या १४ फेब्रुवारी म्हणजे व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी त्याच्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने त्याची हत्या केली होती. हत्येनंतर दोन्ही आरोपी त्याचा मृतदेह रात्री १ वाजता भिवाडी सेक्टरमध्ये फेकून पळाले होते. (हे पण वाचा : धक्कादायक! आई वडिलांपासून वेगळे राहण्याची मागणी करणाऱ्या पत्नीचा खून करुन पतीचीही आत्महत्या)

पोलिसांनी तपास करताना आजूबाजूचे सीसीटीव्ह फुटेज चेक केले. तेव्हा त्यांना समजलं की, दोन लोक मृतदेह बाइकवर घेऊन जाताना दिसले. त्यानंतर पोलिसांनी मृत व्यक्तीच्या पत्नीची कसून चौकशी केली. आधी तिने पोलिसांना आणि नातेवाईकांना सगळं खोटं सांगितलं. पण जेव्हा पोलिसांनी तिला सीसीटीव्ही फुटेज दाखवलं तेव्हा तिने सगळं सांगितलं. तिने हे मान्य केलं की, प्रियकरासोबत मिळून तिने पतीची हत्या केली. (हे पण वाचा : भयंकर! लग्नास नकार दिल्याने मुलीसह आईची धारदार चाकूने केली हत्या;वडील जखमी)

भिवाडीचे पोलीस अधिकारी सुरेंद्र सिंह यांनी सांगितले की, कमल सिंह प्रधान कॉलनीमध्ये पत्नी आणि मुलांसोबत राहत होता. कमल सिंह हा उत्तर प्रदेशच्या बरसानाजवळील उमराया गावात राहणारा होता. कमलची पत्नी जमुनाचे तिचा भाचा असलेल्या मोहनसोबत अनैतिक संबंध होते. कमलला दोघांच्या संबंधाची माहिती मिळाली होती. त्यानंतर दोघांमध्ये वाद होऊ लागले होते. व्हॅलेंटाईन डे ला तिचा प्रियकर घरी आला आणि पुन्हा भांडण झालं. यावेळी दोघांनी गळा आवळून कमलची हत्या केली.

पोलिसांनी केलेल्या चौकशीतून समोर आले की, जमुना देवी तिच्या एका नातेवाईकाच्या लग्नाला गेली होती. तिथे तिची भेट मोहनसोबत झाली आणि दोघांचे अनैतिक संबंध सुरू झाले. ती मोहनसोबत फोनवर नेहमी बोलत होती. यावरून तिच्यात आणि पतीमध्ये भांडणं होत होती. अशात कमल सिंह मदन मोहनकडून २ लाख रूपये मागत होता. २ लाख मिळत नसल्याचे पाहून कमल त्याला पत्नीवर बलात्कार केल्याची तक्रार करण्याची धमकी देत होता. यावरून भांडण सुरू झालं आणि दोघांनी मिळून कमलची हत्या केली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानMurderखून