अलवर – बायको सोडून गेली, गर्लफ्रेंडनं धोका दिला, सासरच्यांनी माझे घेतलेले पैसे परत केले नाहीत. मित्रांनी विश्वासघात केला....हे शब्द राजस्थानच्या अलवर येथे राहणाऱ्या व्यापाराचे आहेत. ज्याने आयुष्याला कंटाळून मृत्यूला कवटाळलं आहे. मृत्यूपूर्वी त्याने ६ मिनिटाचा व्हिडिओ बनवला ज्यात या सर्व गोष्टींचा उल्लेख केला. त्याचसोबत ५ पानी सुसाईड नोटही लिहिली होती. अलवरच्या कोटपुतली-बहरोड येथील ही घटना आहे.
३८ वर्षीय व्यापारी सुनील कुमार शर्मा यांनी मृत्यूपूर्वी एक व्हिडिओ बनवला. हे जग खूप वाईट आहे. कुणीही कुणाचे नाही. सर्व बेकार आहे हे सांगत सुनील शर्मा यांनी कुणी कुणी त्याच्याकडून पैसे घेतले आणि आजवर ते परत केले नाहीत त्यांच्या नावाचा उल्लेख केला. बानसूर येथे राहणाऱ्या एक व्यापारी सुनील कुमार शर्मा यांनी ३१ ऑगस्टला आत्महत्या केली होती. मरण्यापूर्वी त्याने पत्नी आणि गर्लफ्रेंडवर आरोप केला. व्हिडिओत म्हटलं की, १ वर्षापूर्वी माझी बायको सोडून गेली, आजपर्यंत तिने फोन केला नाही. गर्लफ्रेंडने धोका दिला, सासरच्यांनी १ लाख रुपये घेतले होते परंतु ते पुन्हा दिले नाहीत असं त्याने म्हटलं.
सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
तपासावेळी पोलिसांना सुनीलच्या खिशातून एक सुसाईड नोट जप्त केले. या ५ पानी सुसाईड नोटमध्ये आत्महत्येचे कारण सांगत महत्त्वाची माहिती दिली. पोलिसांनी हा मृतदेह पोस्टमोर्टमला पाठवून तिथून नातेवाईकांच्या ताब्यात दिला. सुनीलच्या मृत्यूच्या ११ दिवसांनी अचानक सोशल मीडियावर त्याच्या आत्महत्येपूर्वीचा व्हिडिओ व्हायरल झाला. ६ मिनिटे ५० सेकंदाचा हा व्हिडिओ सर्वांनी पाहिला. सुनीलने आत्महत्या करण्यापूर्वी त्याच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचा उल्लेख केला.
मित्रांनीही विश्वासघात केला
आत्महत्येच्या घटनेनंतर सुनीलचे वडील प्रमोद शर्मा म्हणाले की, बहरोडमध्ये त्याचे मोबाईलचे दुकान होते. काही महिन्यांपूर्वी त्याने मित्रासोबत पार्टनरशिपमध्ये एक हॉटेलही खोलले होते. यावेळी मित्रांनी त्याचे पैसे लुटले. पोलिसांनी या प्रकरणी तपास केला आहे. सुसाईड नोट आणि व्हिडिओत सुनीलने ज्या ज्या लोकांची नावे घेतली त्या लोकांविरोधात एफआयआर नोंदवण्यात आला आहे.
सुनीलने सुसाईड नोटमध्ये लिहिलंय की, मला आत्महत्या करतोय हे लिहिताना खेद वाटतो. मी मोठ्या अडचणीत सापडलो आहे. १२ वर्षापासून माझ्यासोबत हे घडतेय आणि कुणालाही त्याची जाणीव नाही. त्यासाठी मित्रांवर भरवसा करू नये. माझी गर्लफ्रेंडही विश्वासघातकी निघाली. १० वर्ष माझ्यासोबत राहून विश्वासघात करत होती. तिने माझे आर्थिक , मानसिक आणि लैंगिक शोषण केले. कुणाविरोधात माझ्याकडे पुरावे नाहीत हा प्रॉब्लेम आहे असं त्याने म्हटलं आहे.