कोरेगाव भीमा: महिन्यापूर्वी आलेल्या परप्रांतीय विवाहित जोडप्यांमधील महिलेचा कोरेगाव भीमा येथे महिन्यापूर्वी खून झाला असल्याची घटना घडली उघडकीस आली आहे. याप्रकरणी खोलीमालक रवींद्र वामन झांबरे (रा. कोरेगाव भीमा ता. शिरूर जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलीस ठाण्यात मयत महिलेच्या पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापुर पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन, कोरेगाव भीमा ता. शिरूर येथील रवींद्र झांबरे यांच्या मालकीच्या असलेल्या खोल्यांमध्ये महिनाभरापूर्वी एक विवाहित जोडपे भाड्याने खोली घेऊन राहण्यासाठी आलेले होते. त्यावेळी झांबरे यांनी त्यांना त्यांचे नाव विचारले असता सदर युवकाने त्याचे नाव सिंधू जॉनसन असून मुळचा उडिसा येथील असल्याचे सांगितले. तर त्याच्यासोबत असलेल्या त्याच्या पत्नीने तिचे माहेरकडील नाव प्रियांका पितांबर प्रधान असे सांगत आम्ही लग्न केलेले असून आम्ही नवरा बायको असल्याचे सांगितले होते. शनिवारी सकाळी खोलीमालक रवींद्र झांबरे यांच्या पत्नीने शेजारील खोलीत पाहिले असताना त्यांना प्रियांकाच्या खोलीला बाहेरून कडी लावलेली आणि घरामध्ये ती मृतावस्थेत पडलेली असल्याचे आढळून आले. शिक्रापूर पोलिसांना घटनेची माहिती देताच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर वैरागकर, नवनाथ रानगट, पोलीस उपनिरीक्षक शिवशांत खोसे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र शिंदे, पोलीस नाईक विलास आंबेकर, यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असता प्रियांकाच्या खोलीचा दरवाजा बाहेरून बंद होता तर आतमध्ये पाहिले असताना आतमध्ये फरशीवर रक्त सांडलेले तसेच प्रियांका खोलीमध्ये मृतावस्थेत पडलेली असल्याचे आढळून आले. गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार व विलास आंबेकर हे करत आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी व सदाशिव शेलार यांनी भेट दिली...................एटीएम कार्डवरुण मिळवला महिलेचा पत्ताखून झालेल्या महिलेचा व तिच्या नवºयाचा कोणताही ओळखीचा पुरावा नसताना शिक्रापुर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरिक्षक शिवशांत खोसे यानी मृत महीलेच्या एटीएम कार्ड वरून एसबीआय बँकेतुन महिलेचा आधार कार्ड मिळवून त्यावरील पत्यावरून महिलेच्या घरच्यांशी संपर्क करून शोध घेतला.
कोरेगाव भीमात प्रेमविवाह करून पतीनेच केला पत्नीचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2019 6:55 PM