मोबाइल फोनच्या वापरावरून पती-पत्नींमध्ये भांडण सामान्य बाब आहे. मात्र, या कारणावरून अमेरिकेच्या ओहियोमध्ये जे झालं ते हैराण करणारं आहे. एका महिलेने कथितपणे मोबाइल वापरावरून झालेल्या वादानंतर आपल्या पतीवर पेट्रोल टाकलं आणि त्याला जाळलं.
३६ वर्षीय टिफनी हॉल हिला रविवारी कौटुंबिक हिसेंप्रकरणी अटक करण्यात आली होती. तिचा ६२ वर्षीय गंभीरपणे भाजला होता. ओहियोच्या कोलब्रुक टाउनशिपमधून एका शेजाऱ्याने ९११ वर फोन डायल करून याची माहिती पोलिसांना दिल्यावर या घटनेचा खुलासा झाला. (हे पण वाचा : धूम-धडाक्यात सुरू होतं लग्न, तेव्हाच मंडपात तरूणाची पहिली पत्नी पोहोचली; मग झालं असं काही....)
पोलीस प्रवक्त्यांनी सांगितलं की, पीडित व्यक्तीने सांगितलं की, त्याचं आणि त्याच्या पत्नीचं फोनच्या वापरावरून भांडण सुरू होतं. ज्यानंतर पत्नीने अचानक एक बकेट ग्रसोलीन आणलं आणि त्याच्यावर फेकून आग लावली. आग लागल्यानंतर तो मदतीसाठी रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला शेजाऱ्यांकडे गेला. त्यांनी त्याच्यावर स्प्रे केला आणि वैद्यकीय सेवा येईपर्यंत त्रास कमी कमी करण्याचा प्रयत्न केला.
यानंतर त्याला एक्रोन चिल्ड्रेन हॉस्पिटलमध्ये बर्न यूनिटमध्ये दाखल करण्यात आलं. आता त्याची स्थिती स्थिर असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेनंतर पीडित व्यक्तीच्या पत्नीला अटक करून तुरूंगात टाकण्यात आलं आहे.