दिल्लीत सूरज नावाच्या एका व्यक्तीने त्याची पत्नी ज्योतीवर गंभीर आरोप केले आहेत. ज्योतीने त्याला आणि त्याच्या तीन महिन्यांच्या मुलीला मारण्याचा प्रयत्न केला. तिने आतापर्यंत ७-८ वेळा लग्न केलं आहे आणि सासरच्या लोकांवर खोटा बलात्काराचे गुन्हा दाखल करते असं म्हटलं आहे. तसेच सूरजने लग्नानंतर ज्योतीने त्याचा मानसिक छळ केला आणि त्याला कुटुंबापासून पूर्णपणे तोडलं असंही सांगितलं.
सूरजने दिलेल्या माहितीनुसार, "लग्नानंतर ज्योती सतत माझा छळ करायची, मला मानसिक त्रास द्यायची आणि मला माझ्या कुटुंबाशी बोलू देत नव्हती. तिने माझी सर्व नाती तोडली. तर मला ज्योतीबद्दल धक्कादायक सत्य कळलं. मला समजलं की, तिने माझ्यापासून तिचं यापूर्वी सात-आठ वेळा लग्न झालं होतं हे लपवलं होतं."
सूरजचा आरोप आहे की, ज्योती लोकांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवते आणि नंतर काही महिन्यांतच त्यांच्याशी लग्न करते. यानंतर ती तिच्या पतीला त्रास देते जेणेकरून तो तिला सोडून जाईल. ती लोकांकडून पैसे उकळते. ज्योतीने त्याला मारण्याचा प्रयत्न केला. "मी झोपलो होतो. तेव्हा संतापलेल्या ज्योतीने एक बादली उकळतं पाणी, त्यात तिखट आणि मीठ टाकलं होतं आणि ते माझ्यावर फेकलं. माझा फोन हिसकावून घेतला, बाहेरून दरवाजा बंद केला आणि पळून गेली."
"मी बाहेर पडण्याचा प्रयत्न करत राहिलो. दार बाहेरून बंद होतं. मी ते उघडण्याचा प्रयत्न केला, पण ते उघडलं नाही. माझी मुलगीही तिथे होती आणि आवाजामुळे ती जोरजोरात रडू लागली. मी मदतीसाठी ओरडलो, मदत करा! मदत करा! पण कोणीही ऐकलं नाही. नंतर एक खिडकी दिसली, ती तोडली आणि कसा तरी बाहेर आलो आणि मदत मागितली" असं सूरजने म्हटलं आहे.