माहेरी गेलेल्या पत्नीने परत येण्यास दिला नकार, पतीने शहरातील अनेक गाड्या पेटवल्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2022 05:32 PM2022-02-22T17:32:55+5:302022-02-22T17:47:21+5:30
Dehradun Fire : जशी आग लागल्याच्या घटनेची सूचना पोलिसांपर्यंत पोहोचली तर पोलीस लगेच घटनास्थळी आले. त्यांना वाटलं की, काही लोकांनी मिळून हे कृत्य केलं असेल.
उत्तरखंडची (Uttarakhand) राजधानी देहरादूनमध्ये (Dehradun) एक अजब घटना समोर आली आहे. इथे एका माथेफिरूने सिगारेट पेटवण्याच्या लायटरने अनेक गाड्यांना आग लावली. जशी आग लागल्याच्या घटनेची सूचना पोलिसांपर्यंत पोहोचली तर पोलीस लगेच घटनास्थळी आले. त्यांना वाटलं की, काही लोकांनी मिळून हे कृत्य केलं असेल. पोलिसांनी चौकशी सुरू केली तेव्हा त्यांना एक संशयीत व्यक्ती सापडली. त्याला अटक केली. त्यानंतर त्याने पोलिसांना जे सांगितलं त्याने सगळेच हैराण झाले.
काय म्हणाला आरोपी?
आरोपी म्हणाला की, वाहनांना आग लावल्याची बाब त्याने स्वीकारली. तो म्हणाला की त्यानेच लायटरच्या मदतीने वाहनांना आग लावली. ही घटना देहरादूनच्या ब्राम्हवाला आणि आझाद कॉलनीतील आहे. आरोपी तरूणाचं नाव इरफान आहे जो पल्टन बाजारात बांगड्या विकण्याचं काम करतो. आरोपीने पोलिसांना सांगितलं की, त्याची पत्नी बऱ्याच दिवसांपासून माहेरी गेली होती आणि परत येत नव्हती. शनिवारी त्याने पत्नीला पुन्हा घरी परत येण्यास आग्रह केला. तेव्हाही तिने नकार दिला. त्यानंतर तो शहराकडे आग लावण्यासाठी निघाला.
अनेक वाहनांना लावली आग
आरोपीने अनेक ठिकाण वाहनांना आग लावली. तो ज्या ज्या भागातून गेला तेथील वाहनांना पेटवत गेला. यादरम्यान कुणीतरी पोलिसांना याबाबत सूचना दिली. बराच शोध घेतल्यावर आरोपी पकडला गेला. चौकशी दरम्यान आरोपीने सांगितलं की, पत्नी परत येत नव्हती त्यामुळे माझं डोकं सटकलं आणि मग मी पूर्ण देहरादूनमध्ये आग लावली. आता वाहनांचे मालक नुकसानभरपाई मागत आहेत.