धक्कादायक! मासेमारीला जाण्यासाठी विरोध केल्याने पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळलं
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2020 09:19 AM2020-12-06T09:19:04+5:302020-12-06T09:21:06+5:30
Crime News : पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याच्या या भयंकर प्रकारामुळे परिरात मोठी खळबळ उडाली आहे.
नवी दिल्ली - देश सध्या कोरोनाच्या संकटाचा सामना करत असताना अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. अशीच एक घटना मध्य प्रदेशच्या छिंदवाडामध्ये घडली आहे. मासे पकडण्यासाठी सोबत जाण्यास पत्नीने नकार दिला म्हणून रागाच्या भरात पतीने तिला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मासेमारीला जाण्यावरून पती-पत्नीत वाद सुरू झाला. या वादामुळे संतापलेल्या पतीने टोकाचं पाऊल उचललं.
पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळल्याच्या या भयंकर प्रकारामुळे परिरात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर तातडीने पत्नीला उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र गंभीररित्या भाजल्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पत्नीने मासेमारीसाठी एकत्र जाण्यास नकार दिल्यानं पतीने तिला मारहाण केली आणि नंतर पेट्रोल टाकून जिवंत जाळलं.
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात अनेकांचा जीव वाचवणाऱ्या डॉक्टरचा मृत्यूhttps://t.co/5HISPXlez5#coronavirus#CoronavirusIndia#CoronaUpdatesInIndia#COVID19India#coronainindia#CoronaWarrior
— Lokmat (@MiLOKMAT) November 26, 2020
छिंदवाडा येथील तामिया पोलीस ठाण्याच्या परिसरातील डेलखरी गावात ही भयंकर घटना आहे. नवा मोहल्ला येथे राहणारी बलि कहार याची पत्नी गोमतीबाई कहारसोबत रात्री खूप वाद झाला. मासेमारीवरून दोघांमध्ये वाद झाला. पतीने आपल्या पत्नीला एकत्र मासेमारीसाठी जाण्यास सांगितले असता तिने नकार दिला आणि त्यामुळे संतापलेल्या पतीने हे टोकाचं पाऊल उचललं आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास करण्यात येत आहे. या प्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी आणि तपास सुरू आहे. पतीविरोधात कलम 302 विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. अशा अनेक भयंकर घटना या सातत्याने समोर येत आहेत.
कोरोनाचे नियम मोडणाऱ्यांना पाहताच क्षणी गोळी मारण्याचे आदेश, लोकांमध्ये दहशतीचं वातावरण https://t.co/JEOShyjw4b#NorthKorea#KimJongUn#coronavirus
— Lokmat (@MiLOKMAT) December 5, 2020