पतीचा भांडाफोड करण्यासाठी पत्नीने अनोळखी महिला बनून पतीसोबत केलं चॅटींग आणि मग....
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2022 01:55 PM2022-12-29T13:55:15+5:302022-12-29T13:55:31+5:30
Crime News : पतीवर संशय आल्यानंतर पत्नीने फेक फेसबुक आयडीने अनोळखी महिला बनून पतीसोबत चॅंटींग केलं तर सगळी पोलखोल झाली. पती-पत्नी दोघांनीही एकमेकांवर दगा दिल्याचे आरोप लावले.
Crime News : फेसबुकवर मैत्री आणि फसवणुकीच्या अनेक घटना समोर येत असतात. पण आता फेसबुकच्या माध्यमातून पतीचे कारनामे समोर आल्याची घटना उघड झाली आहे. उत्तराखंडच्या रुड़कीमधील ही घटना आहे. इथे एका दाम्पत्यामध्ये लग्नानंतर प्रेम वाढण्याऐवजी 'ती'च्या मुळे त्यांच्यात वाद पेटला. पत्नीला पतीवर संशय होता. त्यामुळे तिने एक फेक फेसबुक आयडी बनवला आणि पतीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. पतीनेही रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केली. त्यानंतर दोघेही चॅट करू लागले. पण नंतर पतीला समजलं की, ही त्याची पत्नीच आहे.
पतीवर संशय आल्यानंतर पत्नीने फेक फेसबुक आयडीने अनोळखी महिला बनून पतीसोबत चॅंटींग केलं तर सगळी पोलखोल झाली. पती-पत्नी दोघांनीही एकमेकांवर दगा दिल्याचे आरोप लावले. त्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेलं.
या महिलेचं रूडकी बंदा रोड येथे राहणाऱ्या एका तरूणासोबत बऱ्याच वर्षापासून प्रेम प्रकरण सुरू होतं. आधी दोघेही पाचव्या वर्गापासून ते इंटरपर्यंत सोबत शिकले. साधारण एक वर्षाआधी दोघांनी निकाह केला. काही दिवसांनी पत्नीला पतीच्या चारित्र्यावर संशय आला. मग महिला पतीवर लक्ष ठेवू लागली. अशात तिला समजलं की, तिचा पती अनेक महिलांसोबत बोलतो. हेच जाणून घेण्यासाठी महिलेने एक फेक फेसबुक आयडी तयार केली.
यानंतर तिने पतीला फेसबुक फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. त्यानंतर महिला आपल्या माहेरी परत आली. पतीने रिक्वेस्ट अॅक्सेप्ट केली. दोघेही चॅटींग करू लागले. माहेरी राहून महिला पतीसोबत रात्रभर चॅंटींग करत होती. सकाळी जेव्हा महिलेने पतीला याबाबत विचारलं तर दोघांमध्ये वाद झाला. पतीने पत्नी मारहाणही केली. त्यानंतर महिलेने पोलिसात तक्रार दिली.
पोलिसांनी महिलेच्या पतीला बोलवलं आणि चौकशी केली. ज्यात त्याने सांगितलं की, त्याची पत्नी फेसबुकवर तरूणांसोबत बोलते. तेच जेव्हा महिलेने फेक फेसबुक आयडीवर पतीचे मेसेज दाखवले तर पोलिसही हैराण झाले. महिलेने पोलिसांना सांगितलं की, पतीचा भांडाफोड करण्यासाठी तिने फेक फेसबुक आयडी तयार केली.